मुंबई : कोणतंही नातं कोणा एका व्यक्तीच्या प्रयत्नांनी चालत नाहीय यासाठी त्या दोघांना त्यामध्ये समान सहभाग घ्यावा लागतो. परंतु बर्याच वेळा विवाहित नातेसंबंधातील पुरुषांना असे वाटते की, सर्व जबाबदारी घेणे हे पत्नीचे काम आहे. ज्यामुळे संसाराची सगळीच जबाबदारी ते आपल्या बायकोवरती टाकतात. ज्यामुळे काहीवेळा त्यांच्या अशा वागण्यामुळे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतं, परंतु तरी देखील बऱ्याच पुरुषांना याचा थांगपत्त लागत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे एकच नाही, तर अशी अनेक कारणे असू शकतात जेव्हा एखादी स्त्री तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेण्यास भाग पाडते. घटस्फोटाचा निर्णय घेणं कोणत्याही बायकोसाठी सोपं नसतं, परंतु अशी काही परिस्थीती उद्भवते, ज्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो. चला जाणून घेऊया की, महिला कोणत्या कारणामुळे घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात.


नात्यात फसवणूक


नातं कितीही घट्ट असो, पण फसवणूक झाली तर ते नातं संपून जातं यात शंका नाही. विवाहबाह्य संबंध हे नाते तुटण्याचे ठोस कारण आहे. लग्नानंतरही पुरुष इतर महिलांकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे सध्याचे नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कोणतीही पत्नी सगळं काही सहन करु शकते, परंतु नात्यात फसवणूक सहन करू शकत नाही आणि यामुळे तिला घटस्फोट घ्यावा लागतो.


सेल्फ रिस्पेक्ट


नात्यात स्त्री-पुरुष दोघांनाही समानतेचा अधिकार आहे, पण समाजाच्या सनातनी विचारसरणीला अजूनही ते पटत नाही. जिथे पती आपल्या पत्नीला स्वतःहून कमी दर्जाचा समजतो आणि अशा परिस्थितीत तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा पत्नीला वैवाहिक नातेसंबंधात सतत तिचा स्वाभिमान दुखावलेला दिसतो तेव्हा ती वाईटरित्या तुटते. लाख प्रयत्न करूनही जेव्हा परिस्थिती सुधारत नाही, तेव्हा एक वेळ अशी येते की तिला घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागतो.


स्वप्नांवर बंधणं


आजच्या काळात बहुतांश महिला नोकरी करत आहेत, अशा स्थितीत लग्नानंतरही त्यांना करिअर सुरू ठेवायचे आहे. असे नाही की लग्नानंतर स्त्रिया गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत नाहीत, कामासोबतच घर सांभाळण्याचे कौशल्यही त्या शिकतात. पण जेव्हा तिचे सासर किंवा पती तिच्या स्वप्नांवर बंधणं घालतात तेव्हा मात्र सर्व अवघड होतं.


आधुनिक युगात महिलांना त्यांच्या करिअरबाबत तडजोड करायची नसते, स्वतंत्र स्त्री असण्यात काहीच गैर नाही आणि जर तुमची पत्नी काम करत असेल, तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. पण तिची स्वप्ने हिरावून घेतल्याने ती घटस्फोटासारख्या निर्णयावर विचार करायला भाग पडते.


मानसिक शोषण


लग्नानंतर स्त्रीच्या अनेक जबाबदाऱ्या वाढतात यात शंका नाही, पण ओझे तिच्यावर टाकणे चुकीचे आहे. पत्नीवर घरातील कामाचा दबाव तिला मानसिक तणावात टाकू शकतो. तुम्ही तुमचे काम तुमच्या पत्नीसोबत समानतेने शेअर करा, जेणेकरून तिचा भार कमी होईल. परंतु जर असे केले नाही तर, या गोष्टीचा परिणाम घटस्फोटाच्या रूपात समोर येतो.