Peanuts and Alcohol Connection : चकणाचं महत्त्व हे कोणत्याही मद्यपानप्रेमीला विचारा. एखाद्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती असा असतो जो कायम चकणावर ताव मारत असतो. अशावेळी मद्यप्रेमीला विचारा त्याला काय वाटतं. श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाला ड्रिंक्ससोबत खारट शेंगदाणे हवे असतात. अगदी तसंच बार असो किंवा फाइव्ह स्टार  रेस्टॉरंट तिथेही महागतल्या महागत ड्रिंक्ससोबत खारट शेंगदाणे ग्राहकांना दिलं जातात. जगभरात मद्यपान आणि शेंगदाणे हे कॉबिनेशन अतिशय लोकप्रिय आहे. या शेंगदाण्याचे पैसेही घेतले जात नाही. मग तुम्ही कधी विचार केला का कधी, ड्रिंक्ससोबत Salted Peanuts का देतात? 99 टक्के मद्यप्रेमींना यामागील कारण माहिती नाही. (Why Bars Serve Salted Peanuts With Drinks Knowing that you will always order peanuts)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्टर ऑफ वाईन सोनल हॉलंड यांनी ड्रिंक्ससोबत Salted Peanuts का देतात यामागील कारणं सांगितली आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अकाऊंटवर sonalholland_masterofwine यावर त्यांनी एका व्हिडीओमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. 


'ही' आहेत तीन कारणं !


तहान वाढवण्यास मदत होते


अल्होकोलसोबत शेंगदाणे देण्यामागे कारण म्हणजे त्याला लागलेले मीठामुळे तहान लागते. यामुळे तुम्ही अधिक ड्रिंक्सची ऑर्डर देता. याचा फायदा साहाजिकच बार आणि रेस्टॉरंटना होतो. यामुळे मद्याची मागणी वाढते. 


रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत


खारट शेंगदाणे एक समाधानकारक क्रंच आपल्याला देतो. त्यासोबत मद्यपान करणाऱ्यांना अधिक सुखद अनुभव देतो. अल्कोहोलमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे खारट किंवा गोड पदार्थांची इच्छा मद्यपान करण्यास होते. 



प्रथिने आणि निरोगी चरबीसाठी मदत 


खारट शेंगदाणे पेयांसह सर्व्ह केल्याने शरीरावर अल्कोहोलचे परिणाम टाळण्यास किंवा कमी करण्यास मदत मिळते. जेव्हा लोक अल्कोहोल पितात, तेव्हा त्यांच्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियम सारख्या महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. खारट शेंगदाणे हे इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरण्यास मदत करतो. ज्यामुळे निर्जलीकरण आणि पिण्याचे इतर नकारात्मक परिणाम तुम्हाला टाळता येतात. खारट शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी असतात जे शरीरातील अल्कोहोलचे शोषण कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरावरील अल्कोहोलचे एकूण परिणाम कमी होण्यास मदत मिळते.