रात्रीच्या वेळी का रडतं बाळ? पैज लावून सांगतो हे कारण तुम्हाला माहितच नसेल
बरेच प्रश्न आई- वडिलांना पडतात
मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर ते कळतं होईपर्यंत आई- वडिलांची नजर काही त्याच्यावरून हटत नाही. बाळाला नेमकं काय होतंय, ते का रडतंय, त्याच्या हसण्या- खिदळण्यामागेही काय कारण आहे, असे बरेच प्रश्न आई- वडिलांना पडतात. त्यांच्या परिनं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. (why do small kids cry at night read details)
मूल रात्री रडू लागलं की, अनेकदा आईवडील बेचैन होतात. पण, काही वेळानं ते शांत होतं आणि हे सर्वकाही Normal असल्याचं समजत याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला माहितीये का एखादी आरोग्य समस्या किंवा स्लीप सायकलमुळं मुलं रात्री रडतात.
बऱ्याचदा बाळाला जेव्हा दात येत असतात तेव्हा त्याला काही वेदना जाणवू लागतात. ज्यामुळं रात्री मुलं रडू लागतात. मुलांना मिळणारी वागणूक किंवा त्यांच्यामध्ये होणारे बदल यामुळंही त्यांना रात्रीच्या वेळी रडू येतं.
पॅसिफायरनं बाटलीतून बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केल्यासही त्यांचं रात्री रडण्याचं प्रमाण वाढू शकतं. पण, या सर्व मुद्द्यांचा अतिविचार करण्याची गरज नाही.
चिंता करु नका
रात्री बाळाची झोप अर्ध्यावरच उघडणं अतिसामान्य आहे. ते जसजसं मोठं होईल तसतसं त्याची ही सवयही मोडेल असं तज्ज्ञांचं मत. पण, बाळासोबत काहीतरी बिनसलंय असं जर तुम्हाला सातत्यानं वाटत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं हा योग्य पर्याय असेल.