मुंबई : गर्भधारणा झाली की महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. यामध्ये एक बदल होतो तो म्हणजे युरीनचा रंग बदलणं. आणि हा एक असा बदलाव असा आहे जो एक होणारी आईच जाणवू शकते. गर्भधारणेदरम्यान युरीनच्या रंगामध्ये बदल होतो. मात्र महिलांना हा प्रश्न असतो की, असं का होतं. तर आज या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.


कसा असला पाहिजे युरीनचा रंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भधारणेदरम्यान हायड्रेशन, डाएट, औषधं तसंच महिलांच्या आरोग्याच्या स्थितीवर युरीनचा रंग अवलंबून असतो. युरीनचा रंग अधिकतर युरोक्रोममुळे बदलतो. त्याचप्रमाणे गर्भधारणेमुळेही युरीनचा रंग बदलतो. 


कसा बदलतो युरीनचा रंग


गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत मळमळ आणि उलट्या होणं ही तक्रार सामान्य आहे. यामुळे निर्जळीकरण होऊ शकतं. ज्यामुळे युरीनचा रंग गडद होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या काळात विविध विटॅमीन्स आणि सप्‍लिमेंट्समुळे युरीनचा रंग बदलू शकतो. यामध्ये एक काळजी घ्यावी ती म्हणजे सप्‍लिमेंट्सच्या ओवरडोसमुळे युरीनमधून रक्तस्राव होऊ शकतो.


आहाराचाही होतो परिणाम


गरोदरपणात आहारातील बदल देखील युरीनचा रंग बदलण्याचं कारण असू शकतात. काही खास ​​फळं आणि भाज्या जसं की, बीट आणि शतावरी यामुळे युरीनचा रंग बदलू शकतो.


किडनीच्या समस्या


किडनीच्या समस्या असल्यास युरीनचा रंग गडद होऊ शकतो. दुसरीकडे, गरोदरपणात किडनी स्टोनचा त्रास असल्यास युरीनमध्ये ओटीपोटात दुखणं, मळमळ आणि उलट्या यासह रक्तस्रावही होऊ शकतो. 


डॉक्टरांची मदत कधी घ्यावी


जर तुमच्या युरीनचा रंग सतत बदलत असेल किंवा तुमच्या युरीनमधून रक्तस्राव होत असेल, किंवा युरीनदरम्यान तीव्र वेदना होत असतील आणि वारंवार युरीन होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावेळी डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट करण्यास सांगू शकतात.