महिलांसाठी- मासिक पाळीचं चक्र का बिघडतं?
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळी ही साधारणत: 28 दिवसांची असते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे मासिक पाळी लवकर येते किंवा लांबली जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की मासिक पाळीचं चक्र नेमकं कोणत्या कारणामुळे बिघडतं.
मुंबई : प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळी ही साधारणत: 28 दिवसांची असते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे मासिक पाळी लवकर येते किंवा लांबली जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की मासिक पाळीचं चक्र नेमकं कोणत्या कारणामुळे बिघडतं.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मासिक पाळीचं चक्र बिघडण्यासाठी एक कारण असतं ते म्हणजे ताणतणाव. याशिवाय अनेकदा आहारातील बदलामुळे देखील मासिक पाळी येण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो. तर जाणून घेऊया का बिघडतं मासिक पाळीचं चक्र-
का बिघडतं मासिक पाळीचं चक्र?
अनेकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. तणावामुळे रक्तस्रावाचे दिवस कमी किंवा जास्त होतात, यामुळे पाळी चुकू शकते
रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबण्याच्या 10 वर्षं आधीपासूनच पाळी अनियमित येऊ शकते
वजन कमी होणं किंवा वाढणं यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. आणि याचा मासिक पाळीवर परिणाम होतो
गर्भनिरोधक गोळ्या, पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या यामुळे पाळीसाठी उपयुक्त असलेल्या इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरकावर परिणाम होतो आणि पाळीचे चक्र बिघडते
‘पॉलिसिस्टिक ओव्हरिज डिसीस’ म्हणजे (पीसीओडी), यात गर्भाशयात आलेल्या लहान-लहान गाठींमुळे पाळीवर परिणाम होतो
थायरॉईड ग्रंथींतील हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे पाळीचे चक्र बिघडतं