मुंबई : लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पती पत्नीचे नाते म्हणजे दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिंचे एकत्र येणे. हे एकत्र येणे हे आयुष्यभरासाठीचे असते. काहींच्या बाबतीत हे अर्धवट सत्य ठरते. तर काहींच्या बाबतीत जाणिवपूर्वक केलेली कृती. कारण अनेकदा असे दिसते की, पती-पत्नीत भांडणे ही नित्याची बाब. अनेकांच्या मते त्यातून प्रेम वाढते. पण, पुरूषप्रधान संस्कृतीत अधिक वेळा पत्नीला धोका मिळतो. कोणताही पत्नी इतर कोणतीही गोष्ट सहन करू शकते. पण, पतीचा धोका ती सहन करू शकत नाही, असे म्हणतात. पण, असे होऊनही त्या आपल्या पतीसोबत एकत्र राहतात. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे..


 वेळ देणे


 अनेकदा महिला आपल्या पतीची चूक पोटात घेतात. त्याला सुधारण्याची संधी देतात. त्यासाठी त्या त्याला पुरेसा वेळ देऊ इच्छितात. जेणेकरून त्याला आपली चूक लक्षात यावी आणि तो सुधारावा.


 भीती


 आपल्याकडे अद्यापही महिलांना आर्थिक सक्षमता नाही. त्यामुळे नवऱ्याने सोडले किंवा आपण स्वत:हून त्याच्यापासून फारकत घेतली तर, आपले काय होणार ही भीतही अनेकदा महिलांच्या मनात असते.


 सामाजिक दबाव


 कोणाचाही संसार मोडणे हा सामाजिक दृष्ट्या काहीसे नकारात्मक समजले जाते. त्यामुळे संसार तुटला तर आपण समाजाच्या नजरेत चुकीचे ठरू, आपले नाव खराब होईल, मानहानी होईल या समजातूनही अनेकदा पतीसोबत एकत्र राहिले जाते. 


 आत्मविश्वासाचा आभाव


 अनेकदा काही महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. कौटूंबिक पातळीवर संघर्ष झाल्यास महिला स्वत:ला एकाकी आणि अपराधी समजू लागतात. यातूनही नवऱ्यासोबत राहण्याची अपरिहार्यता येत राहते.


 मुलांमध्ये जीव गुंतणे


 आपले भांडण, नाराजी ही पतीसोबत आहे. आपल्या दोघांच्या भांडणात मुलांची फरफट का करायची. त्यामुळे मुलांमध्ये जीव गुंतल्यानेही महिला धोकेबाज पतीसोबत राहतात.


 हक्क


 पतीने धोका दिला तरी, त्यावर आपला हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावरचा हक्क सोडणे याची कल्पनाही अनेक महिलांना सहन होत नाही. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्या पतीसोबत राहणेच पसंत करतात.


 जोखीम स्विकारूनही धोका मिळाला तर


 पतीपासून वेगळे होऊन आपण नवा संसार थाटला तर, नव्या व्यक्तीकडून धोका मिळणार नाही याची खात्री काय?, असा विचार करूनही महिला धोकेबाज पतीसोबत एकत्र राहतात.
 अर्थात प्रत्येकाची भूमिका वेगळी व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या कारणव्यतिरीक्तही अनेक कारणे असू शकतात.