गोरं होण्याचा अट्टाहास जीवावर बेतणार? फेअरनेस क्रीम करणार किडनी निकामी?
चुकीचं फेअरनेस क्रीम वापरल्यानं काय वाट लागू शकते, याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आलाय.
Fairness Cream Kidney Dieses : लाव फेअरनेस क्रीम आणि हो गोरी.... असं म्हणत अनेक जणी गोरं होण्यासाठी सर्रास फेअरनेस क्रीम वापरतात. पण चुकीचं फेअरनेस क्रीम वापरल्यानं काय वाट लागू शकते, याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आलाय.
एका विशीतल्या तरुणीनं स्थानिक कंपनीचं फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली... तिच्या चेह-यावर ग्लो आला... आणि लोक तिचं कौतुक करु लागले... मग तिच्या आई आणि बहिणीनंही तेच फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली आणि पुढे धक्कादायक प्रकार घडला...
फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर काही महिन्यांनी तिघींना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आजार झाला.
या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात.
एकाच घरातल्या तिघींना हा आजार कसा झाला याबद्दल केईएम रुग्णालयात अभ्यास करण्यात आला
आणि संशयाची सुई फेअरनेस क्रीमकडे वळली
या फेअरनेस क्रीममध्ये पाऱ्याची पातळी 1 पीपीएम म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात होती
सामान्य माणसाच्या शऱीरातल्या रक्ताची पातळी 7 एवढी असते.
पण ते फेअरनेस क्रीम वापरणा-या तरुणीच्या रक्तात पा-याची पातळी तब्बल 46 एवढी होती
अकोल्यातल्या त्या तरुणीच्या आई-बहिणीचा आजार बरा झालाय. पण ती तरुणी अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. पारा मानवी शरिरासाठी विषारी असतो. तरीही फेअरनेस आणि ब्युटी क्रीममध्ये पा-यासारखे धातू सर्रास वापरले जातात. त्यामुळे वेळीच धडा घ्या... आणि तुम्ही वापरताय त्या फेअरनेस क्रीममध्ये नेमके काय घटक आहेत, याची शंभर वेळा खात्री करुन घ्या