How to heal cracked heal rapidly:  हिवाळा सुरु होतोय, पहाटे गार वारे वाहायला सुरवात झालीये. वातावरणात आता थंडावा वाढू लागला आहे.(WINTER IS COMING)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलत्या ऋतूंचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. बदलत्या हवामानात सर्वात आधी आपल्या त्वचेवर परिणाम होतो कारण त्वचा खूप नाजूक असते. 


हिवाळ्यात वातावरणात आद्रता कमी असते परिणामी स्किन ड्राय होते.  हिवाळ्यात ड्राय स्किनसोबतच पायांच्या भेगांत दुखणं सुद्धा सुद्धा डोकं वर काढत.


अशा वेळी वेदना तर होतातच त्याचसोबत चारचौघात वावरताना शरम वाटू लागते . अशा वेळी काय उपाय करायचे हे कळत नाही, आपण अनेक क्रीम्स वापरून पाहतो , डॉक्टरांचे  सल्ले घेतो मात्र तरीही काहीच फरक पडताना दिसत नाही. 


मग अशा वेळी काय करायचं हा प्रश्न आपल्याला सतावतो. तर आता नो टेन्शन !


सर्वात आधी काही बेसिक गोष्टीची सवय बाळगून पायांची काळजी घेणं महत्वाचं आहे 


झोपण्यापूर्वी, आपले पाय चांगले धुवा आणि हलक्या स्क्रबने घोट्या स्वच्छ करा.


टॉवेलने ते चांगले कोरडे करा आणि नंतर त्यांना हवा कोरडे करा.


आता घोट्यांवर व्हॅसलीनचा जाड थर लावा मुरेपर्यंत मसाज करा 


त्यावर रात्रभर सुती मोजे घाला 


खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल 


व्हॅसलीनऐवजी बोरोप्लस वापरू शकता. हे दोन्ही लावायचे नसेल तर घरात असलेले खोबरेल तेल  किंवा बदामाचे तेल लावता येते. या दोन्ही तेलांमुळे डीप  हायड्रेशन होत आणि फरक पडतो. 


दिवसभर सर्व कामे झाल्यावर रात्री पाय चांगले धुवा. एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात आपले पाय 15-20 मिनिटे ठेवा. आता पायांवर  कोरफड जेल लावा आणि त्यावर लोकरीचे मोजे घाला आणि ते रात्रभर असेच राहूद्या. लवकरच फरक पडेल. 


 (वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही)