Winter Health Tips In Marathi : हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. हिवाळ्यात हवामान थंड असल्याने आळस येणे स्वाभाविक आहे. हिवाळ्याची सुरुवात होताच आपल्या शरीरातील चैतन्य कुठेतरी नाहीसे होते. आपण कितीही प्रयत्न केले तरी हिवाळ्यात आळशीपणाचा सामना करणे कठीण आहे. त्यामुळे तुमची उत्पादकता कमी होते. आपण आळस दूर करण्यासाठी आणि थंडी लागू नये म्हणून अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करतात. तसेच, लोक थंडीपासून बचाव म्हणून चहा आणि कॉफीचा आधार घेतात या सर्व गोष्टींमुळे तुमच्या शरीराला इजा होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात बहुतेक लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. परंतु काही संशोधनात असे दिसून आले आहे की, पाण्याचे तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा आणि केस खराब होऊ शकतात. याचा अर्थ त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. गरम पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींचे नुकसान होते. त्यामुळे कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.


- गरम पाण्यात अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. त्वचेवर मुलायमपणाचा अभाव होतो. जर ज्यांची त्वचा संवेदनशील  आहे असा व्यक्तींनी कोमट अथवा थंड पाण्याने आंघोळ करावी. कडक गरम पाणी वापरु नये. 
तसेच जास्त गरम  पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील छिद्र उघडतात. त्वचा नाजूक असते. त्यामुळे संसर्ग आणि ऍलर्जीचा धोका वाढतो. 
- एका संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, गरम पाण्यात आंघोळ केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
- तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्याने सुस्ती येते. सतत झोप लागते. लहान मुलांना गरम पाण्याने आंघोळ घातली तर ते चांगले झोपतात. असे म्हणतात की गरम पाण्याने अंघोळ केल्यावर चांगली झोप लागते. तर थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर आळस आणि झोप निघून जाते आणि ऊर्जा येते. दिवसभर उत्साहात असतो.
 - गरम पाण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि मॉइश्चरायझर कमी होते. शरीरातील नॅचरल ऑइल लवकर संपण्याचा धोका असतो. यामुळे सुरकुत्या दिसू शकतात आणि चेहऱ्याची चमक निघून जाऊ शकते. 
- खूप गरम पाण्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. डोळे खाज सुटतात आणि संसर्गाचा धोका जास्त असतो. 


जास्त कपडे घालणे 


हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी बहुतेक लोक उबदार कपडे घालतात. एवढेच नाही तर काही लोक एकाच कव्हरमध्ये अनेक कपडे घालतात. तुम्ही तसे न केल्यास तुमचे शरीर जास्त तापू शकते. जेव्हा आपल्याला थंडी वाजते तेव्हा मानवी रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशी तयार करते. जे शरीराला संक्रमण आणि आजारांपासून सुरक्षित आराम देते. परंतु जेव्हा शरीर जास्त गरम होते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करू शकत नाही.