Healthy Drink: दिवाळीनंतर हिवाळा सुरू होतो. हा ऋतू आरोग्यदायी (Health tips) फायदेशीर असतो असं म्हटलं जातं. मात्र, हिवाळ्यात अनेक सर्दी फ्लूसारखे आजार होण्याची शक्यता असते. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत असते. आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्हाला थंडीपासून बचाव (Tips for winter) करता येऊ शकतो.


गरम सूप प्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅलर्जीचा सामना करणाऱ्या पदार्थांमध्ये सूपचा देखील समावेश होतो. सूप आरामदायी आणि उपचारात्मक आहे. तुम्ही तुमच्या आहारात विविध सूपचा समावेश करा आणि स्वतः घरी तयार करून पिऊ शकता... तुम्ही गरम सूप देखील पिऊ शकता.


आल्याचा वापर करा...


आलंचा दररोज वापर केल्याने आरोग्यासाठी फायदा होतो. आलं हे अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असतं. आल्याचा रस मधात मिसळा आणि नंतर कोमट पाणी आणि लिंबाच्या रसामध्ये मिसळून सेवन करू शकता.विशेष म्हणजे आल्यामध्ये सेस्क्विटरपेन्स नावाचं रसायन असते, जे सामान्य सर्दीचे प्रमुख कारण असलेल्या राइनोव्हायरसशी लढते.


दुध आणि हळदीचा वापर करा...


सर्दी झाली असल्यास प्रत्येकाच्या घरात एक उपाय असतोच...दुध आणि हळद...सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी अनेक तज्ञ दररोज एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद मिसळून पिण्याचा सल्ला देतात. श्वसनाचे विकार, सूज, सांधेदुखची समस्या, यकृताच्या समस्या, पचन समस्या आणि मधुमेह यांसारख्या विविध आरोग्यविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.


आणखी वाचा- किस करण्याचे आहेत अनेक फायदे, समोर आलं वैज्ञानिक कारण!


दरम्यान, हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात ताज्या हवेत फिरणं गरजेचं आहे. तसेच उन्हात देखील काही वेळ थांबल्याने शरीरास पुरेपुर विटामिन मिळते. पाय थंड झाले तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऋतूत मोजे घालावेत. त्याचा फायदा लगेच जाणवतो.