किस करण्याचे आहेत अनेक फायदे, समोर आलं वैज्ञानिक कारण!

काय सांगता! किस केल्यानेही होतो फायदा...जाणून घ्या!

Updated: Nov 2, 2022, 10:52 PM IST
किस करण्याचे आहेत अनेक फायदे, समोर आलं वैज्ञानिक कारण! title=

Calories burn in french Kiss : किस करण्याचे फायदे म्हटलं तर तुम्हाला थोडं जड जाईल. किस घेतल्याचे अनेक फायदे आहेत. एक किस घेण्यासाठी अनेक स्नायूंचा वापर केला जातो. किस घेताना 26 कॅलरीज खर्च होतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार 10 सेकंद किस केल्याने 8 करोड बॅक्टेरिया एक दुसऱ्यांसोबत शेअर करतात याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. 

जेव्हा दोघेजण एकमेकांचे चुंबन घेतात त्यावेळी सरासरी 9 मिलीग्राम पाणी, 0.7 मिलीग्राम प्रथिने, 0.18 मिलीग्राम सेंद्रिय संयुगे, 0.71 मिलीग्राम चरबी आणि .45 मिलीग्राम सोडियम क्लोराईडची शरीरातून एकमेकांना शेअर करतात. एका किससाठी जवळजवळ 30 स्नायूंचा वापर केला जातो. 

किस केल्याने तुमचं मन शांत होण्यास मदत होते त्यासोबतच ताण-तणाव कमी होतो आणि मेंदुही फ्रेश होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किस केल्याने प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.

एका अहवालानुसार, बालपणामध्ये ओठांना सतत चुंबन आणि उत्तेजना यामुळे प्रेम आणि सुरक्षिततेची भावना येते. त्यामुळे भविष्यातही कोणासाठी हीच भावना निर्माण होते.

जेव्हा आपण एखाद्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला विशेष वाटते. जेव्हा जेव्हा कोणी दुसऱ्याला ओठांनी स्पर्श करतो तेव्हा आपल्याला त्याच्या स्पर्शाची अनोखी अनुभूती येते. कारण ओठ खूप संवेदनशील असतात.

अहवालानुसार, जननेंद्रियाव्यतिरिक्त, ओठांच्या टोकावर मज्जातंतू न्यूरॉन्स देखील आहेत. त्यामुळे अनेक शरीराच्या कोणत्याही भागावर आढळत नाहीत. डोळ्याच्या अगदी खाली सेबेशियस ग्रंथी असतात ज्यामुळे एक वासही येतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)