मुंबई : टीबीमध्ये अनेकदा रुग्णाच्या किडनीवर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर मेंदू आणि पाठीच्या कण्यावर देखीवर परिणाम होतो. टीबी झाल्यावर डॉक्टर एँटीबायोटिक औषधे देऊन रूग्णांना बरे करतात. मात्र अनेकांनी टीबी या आजारामुळे आपला जीव गमावला आहे. एका महिलेला सतत सर्दी, खोकला, ताप सारखा त्रास जाणवू लागला. हा त्रास तिला जवळपास सहा महिने चालला. तेव्हा तिला वाटलं की, आपल्याला टीबीची लागण झाली. मात्र जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिच्या फुफ्फुसात कंडोम (Condom) अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 वर्षीय शिक्षिकेवर एंटीबायोटिक्स आणि एंटी-ट्यूबरक्लोसिस माध्यमातून उपचार केले जात होते. मात्र महिलेवर कोणताच बदल होत नव्हता. मात्र महिलेने उपचार घेणं थांबवलं नाही. आणि धक्कादायक बाब समोर आली. महिलेचा टीबी रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र तिला काही बरे वाटे ना. 


डॉक्टरांनी जेव्हा महिलेच्या छातीचा एक्स रे रिपोर्ट केला. तेव्हा तिच्या डाव्या फुफ्फुसाला सूज आली होती. तेव्हा सूज आलेल्या भागाची तपासणी करण्यात आली. एक बॅगेसारखा प्रकार फुफ्फुसात आढळला. त्याचा थोडाच भाग आढळून आला. तपासात हा कंडोमचा तुकडा असल्याचं समोर आलं. 


27 वर्षीय महिला शिक्षिका आणि तिच्या नवऱ्याने Fellation करत असताना हा प्रकार घडला. यावेळी कंडोम अतिशय सैल पडल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसेच महिलेला तेव्हा सर्दी, खोकल्याचा त्रास देखील जाणवला. महिलेला आपण नकळत कंडोम गिळल्याचं सांगणं थोडं लाजीरवाणं वाटत होतं. त्यामुळे तिने अशी कारणं दिली.