Health News : लग्न झाल्यावर मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यात अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. याताल सर्वांच्या डोळ्यावर येतं ते म्हणजे स्त्रियांचं वाढतं वजन, याचा थेट संबंध शारीरिक संबंधांशी जोडला जातो. लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवल्यामुळे स्त्रियांचं वजन वाढतं असं बोललं जातं. कारण यामुळे अनेक स्त्रिया सेक्स करणं टाळतात. मात्र खरच असं आहे का?, जाणून घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांचे म्हणणं आहे की सेक्समुळे नाहीतर वजन हे सेक्स हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वाढतं. जेव्हा लैंगिक संबंध ठेवले जातात त्यांचे सेक्स हार्मोन्स उत्तेजित झाल्यामुळे असंतुलित होतात. या संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अनेक वेळा मानवी शरीरात चरबी वाढू लागते आणि ती चरबी होऊ लागते. पण, माणसाला लठ्ठ असण्याची अनेक कारणं असू शकतात. अनुवंशिकता, तणाव, आहार, जीवनशैली अशी अनेक कारणे आहेत.


लग्नाचं योग्य वय 22 ते 26 आहे. पण आता शिक्षण-नोकरीमुळे लग्न ही 28 नंतर होताना दिसत आहेत. या काळात महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होऊ शकतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वयाच्या 30 नंतर शरीरामधील मेटाबॉलिकचं प्रमाण कमी होतं त्यामुळे वजन वाढू शकतं. 


लग्नानंतर घरातले नवीन जोडप्याकडून गुड न्युजची वाटच पाहत असतात. पती आणि पत्नीसाठी हा वेगळा अनुभव असतो, ज्यावेळी गुड न्युज मिळते त्यावेळी गर्भधारण झालेल्या महिलेचं वजन वाढतं. बाळंतपणानंतर महिला योग्य प्रकारे काळजी घेत नाही त्यामुळेही वजन वाढतं. 


जर आपण सेक्स हार्मोन्सबद्दल बोललो, तर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि डीएचईए आणि इतर असे हार्मोन्स आहेत जे असंतुलनामुळे लठ्ठपणा वाढवतात. त्याच वेळी, महिलांचे वजन वाढण्याचे कारण पीसीओडी किंवा प्री-मॅच्युअर पेरिमेनोपॉज देखील असू शकते. 


DHEA हा एक असा हार्मोन आहे, जो महिला आणि पुरुषांच्या सेक्स हार्मोन्ससाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या कमतरतेमुळे वजनही वाढते. त्याच वेळी, महिलांचे अंडाशय आणि अधिवृक्क ग्रंथीमधून इस्ट्रोजेन हार्मोन्समुळे वजन वाढते. यासोबतच प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स महिलांची लैंगिक परिपक्वता वाढवतात, तसेच गर्भधारणेसाठी महिलांचे शरीर मजबूत बनवते. हे देखील वजन वाढण्याचे एक कारण आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)