women misbehavior in labor room In Marathi : 'आई' हा शब्द जितका सुंदर आहे तितकाच त्याचा प्रवास कोणत्याही स्त्रीसाठी कठीण आहे. गर्भधारणेचा काळ अधिक आनंददायी, वेदनारहित आणि आनंददायी बनवण्यासाठी महिलांच्या आरामासोबतच व्यायामाचीही नितांत गरज आहे. गरोदरपणात शारीरिक आरोग्य आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण याचदरम्यान आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असतो, परंतु काही महिलांसाठी हा अनुभव भयानकही असू शकतो. कारण प्रसूतीदरम्यान महिलांवरील अत्याचाराच्या घटना जगभरातील अनेक देशांमध्ये सर्रास घडत आहेत. या घटनेविरोधात एक धक्कादायक अभ्यास उघडकीस आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलंबिया विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासात अस म्हटलं की, जगभरातून आठपैकी एका महिलेला प्रसूतीदरम्यान 'लेबर रूम हिंसाचाराचा' सामना करावा लागतो. या अभ्यासानुसार, 2020 मध्ये पहिल्यांदा माता बनलेल्या 13.4% महिलांनी प्रसूतीदरम्यान गैरवर्तनाचा सामना केल्याचे सांगितले. 


गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान गैरवर्तनाचा सामना 


जगभरातून आठपैकी एका महिलेला प्रसूतीदरम्यान 'लेबर रूम हिंसाचाराचा' सामना करावा लागतो. यामध्ये प्रसूतीदरम्यान डॉक्टरांचे दुर्लक्ष, मदतीच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे किंवा उशीरा प्रतिसाद देणे, प्रसूतीदरम्यान ओरडणे किंवा शिव्या देणे, उपचार बंद करण्याची धमकी, अभद्र भाषेचा वापर, संमतीशिवाय योनी चाचणी करणे, सी-सेक्शनसाठी दबाव टाकणे, अविवाहित महिलांचा सर्वाधिक बळी जातो, अशाप्रकारच्या घटनांचा गर्भवती महिलांना सामना करावा लागत होता. 


तसेच  अविवाहित महिलांना सर्वाधिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, असे या अभ्यासात आढळून आले आहे. याव्यतिरिक्त, ज्या स्त्रिया वैद्यकीय विम्यावर जन्म देतात, लठ्ठ आहेत किंवा मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांना देखील अत्याचाराचा धोका जास्त असतो.


लेबर रूम हिंसाचाराचा प्रभाव


लेबर रूम हिंसाचाराचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे प्रसूतीदरम्यान वेदना आणि समस्या वाढू शकतात, तसेच नैराश्य, चिंता आणि PTSD (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच गंभीर विषयावर जनजागृती करणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय लेबर रूम हिंसाचार रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण देखील आवश्यक आहे. महिलांना अत्याचाराच्या घटनांची तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि योग्य कारवाईची मागणी केली पाहिजे. सर्व महिलांना सुरक्षित आणि सन्माननीय प्रसूतीचा अनुभव मिळावा याची खात्री करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.