गर्भाशयाच्या कर्करोगाच्या बाबतीत महिलांमध्ये जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. हा कर्करोग खूप धोकादायक असतो कारण त्याची लक्षणे सुरूवातीला अस्पष्ट असतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, गर्भाशयाच्या कर्करोगाचे केवळ 20% प्रकरणेच सुरुवातीच्या टप्प्यात शोधले जातात. जर कर्करोग लवकर ओळखला गेला, तर 94% रुग्ण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भाशयाचा कर्करोग स्त्री प्रजनन प्रणालीच्या एक भाग म्हणून अंडाशयात विकसित होतो. हा कोणत्याही वयात होऊ शकतो, पण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये याचा धोका जास्त असतो. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे अस्पष्ट असतात, जसे की पोटात सूज, भूक कमी होणे किंवा वारंवार लघवीची इच्छा. त्यामुळे अनेक वेळा तो उशिरा ओळखला जातो.


गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे:
गर्भाशयाच्या कर्करोगाची अनेक लक्षणे असू शकतात. पोटात सूज किंवा जडपणा वाटणे, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होणे, भूक लागणे किंवा भूक न लागणे, लघवी करण्याची तीव्र इच्छा, अपचन किंवा पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब, पाठदुखी , शारीरिक थकवा, कारण नसताना वजन कमी होणे, मेनोपॉझ नंतर रक्तस्त्राव ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 


 गर्भाशयाच्या कर्करोगाचे घटक:
1. वय: 50 वर्षांच्या पुढे धोका वाढतो.
2. जीन्समधील बदल: BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये उत्परिवर्तनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
3. कौटुंबिक इतिहास: जर कुटुंबात कोणाला गर्भाशयाचा किंवा स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर धोका अधिक असतो.
4.लवकर मासिक पाळी किंवा उशीरा रजोनिवृत्तीसारख्या स्थितींमुळे धोका वाढतो.


गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कसा कमी करावा?
जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल तर लगेचंच बंद करा. यामुळे महिलांमध्ये अनेक समस्या उद्भवू लागतात. वजन वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा. जर कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


उपचार:
गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी आणि स्कॅनिंग केले जाते. याचे मुख्य उपचार शस्त्रक्रिया आणि केमोथेरेपीवर आधारित असतात. कर्करोगाचा टप्पा, प्रकार आणि रुग्णाच्या आरोग्याच्या स्थितीवर आधारित उपचार योजना ठरवली जाते.


( Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )