मुंबई : फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट अॅटॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज वर्ल्ड बनाना डे आहे. या विशेष दिवशी जाणून घ्या अति पिकलेल्या केळ्याचे जबरदस्त फायदे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळ्याचा रंग जस-जसा काळा पडत जातो, ते अधिक, अति पिकलं जातं असं केळं अनेक जण खराब झालं म्हणून किंवा काळं आणि अतिशय मऊ झालं म्हणून खायला आवडतं नसल्याचं सांगतात. परंतु अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं. या केळ्याच्या दररोज खाण्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. 


रंगाच्या आधारे केळं पिकलेलं आहे किंवा कच्चं आहे याचा अंदाज लावता येतो. केळ्याचा रंग जर हिरवा असेल तर ते कच्चं केळं म्हणून ओळखलं जातं. अशा केळ्याचा वापर भाजीसाठी केला जातो. त्यानंतर केळ्याचा रंग पिवळा होत जातो. केळं अधिक पिकत गेलं की त्यावर काळे डाग पडायला सुरूवात होते. त्यानंतरही काही दिवसांत केळ्याचं संपूर्ण सालचं काळं पडत.  


यूनायटेड नेशनमधील 'इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट' या संस्थेने अति पिकून संपूर्ण साल काळं पडलेल्या केळ्याचे महत्त्व, त्याचे फायदे सांगितले आहेत. अशा केळ्यात ट्रिप्टोफैन मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे मानसिक ताण, चिंता (Anxiety) कमी होण्यास मदत होते. तसेच या मोठ्या प्रमाणात पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे अशा केळ्याचा वापर ब्रेड बनवण्यासाठी तसेच मिल्कशेक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. 



हिरवी साल असलेलं केळं खात असाल तर त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हे केळं अगदी हळू-हळू पचतं. त्यामुळे ब्लड ग्लूकोज कमी प्रमाणात निर्माण होतं. पिकलेलं केळं अॅन्टी-ऑक्सिडेंट म्हणून मानलं जातं. हे केळं मेटबॉलिज्म अर्थात चयापचन क्रियेला मजबूत करण्यात मदत करते. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता अतिशय कमी होते. हे केळं अगदी सहजतेने पचतं. त्यामुळे अति पिकलेल्या केळ्याचा वापर नाश्त्यामध्ये करणे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. डॉक्टरांकडूनही सकाळच्या नाश्त्यात केळं खाणं गुणकारी मानले जाते. 




केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. केळ्याचा वापर सौदर्यासाठीही केला जातो. केळं शक्तिवर्धक आहे. दररोज केळी खाणाऱ्या व्यक्तीला एनिमियाचा धोका नसतो. केळं खाल्याने मूडही चांगला राहतो. थकवा दूर होतो. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडेही मजबूत होतात.