मुंबई : आज जागतिक मधुमेह दिन आहे. जगभरात मधुमेहाचं प्रमाण वाढतं आहे. भारतीयांच्या गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो आहे. गेल्या २९ वर्षांत मधुमेह भारतात मृत्यूचं सातवं कारण ठरतं आहे. भारतात प्रत्येक बारा व्यक्तीमागे एक जण मधुमेहाचा शिकार आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भारतात मधुमेहाची राजधानी बनण्यास वेळ लागणार नाही. सध्या चीननंतर भारताचा मधुमेहाच्या रुग्णांत दुसरा क्रमांक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेहामुळे हृदयरोग, किडनीचा आजार तसंच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतायत. असं असलं तरी मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या २०१७च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे ७ कोटींहून अधिक रुग्ण आहे. २०३४पर्यंत जगभरात १३ कोटींहून अधिक रुग्ण असण्याची शक्यताय. रुग्णांनी आपली मधुमेहाची पातळी एक टक्क्यांनीही कमी केली तरी मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे पॅरालिसिसचा धोका १२ टक्के कमी होऊ शखतो. 


हार्ट अॅटॅकचा धोका १४ टक्के कमी होऊ शकतो. किडनीचे आजार ३३ टक्के तर मधुमेहामुळे अवयव कापण्याच्या शक्यतेत ४३ टक्के कमी होऊ शकतात. एचबीए १ सीचा स्तर ५ टक्क्यांहून खाली असल्यास व्यक्तीची प्रकृती उत्तम मानली जाते. एचबीए १ सी एक ब्लड टेस्ट आहे. त्याची तीन महिन्यांनी टेस्ट करावी. त्यानुसार भारतात मधुमेह प्रचंड वाढत असल्याचं दिसतंय. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वांनी मधुमेहाची चाचणी करून घेणं आवश्यक आहे.