मिरगीचे झटके का येतात? याची लक्षणे आणि वाचण्याचे उपाय जाणून घ्या
World Epilepsy Day 2024: मिरगीचा झटका आल्याने लोकांचे मेंदुचे संतुलन बिघडते आणि अशा लोकांना कधीही झटका येऊ शकतो.
World Epilepsy Day 2024: जगात पाच कोटी मिरगीचे रुग्ण असून त्यात दरवर्षी पन्नास लाखांची भर पडते, असे सांगितले जाते. यातून आपल्याला मिरगीच्या आजाराची गांभीर्यता लक्षात येऊ शकते. मिरगीला एपिलेप्सी असे म्हणतात. हा एक क्रोनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये डोक्याचे संतुलन पूर्णपणे बिघडते. मिरगी आल्यानंतर डोक्याची एल्क्ट्रिकल अॅक्टीव्हिटी खराब होते. यामुळे लोकांना वारंवार मिरगीचा झटका येतो.
मिरगीचा झटका आल्याने लोकांचे मेंदुचे संतुलन बिघडते आणि अशा लोकांना कधीही झटका येऊ शकतो. मिरगीचा झटका का येतो? याची लक्षणे काय आहेत? हे ठीक होऊ शकत का? याबद्दल डॉ. विनित बंगा यांनी माहिती दिली आहे.
मिरगीचे 2 प्रकार
मिरगी 2 प्रकारची असतो. पहिली जनरलाइज्ड एपिलेप्सी आणि दुसरी फोकल एपिलेप्सी. जनरलाइज्ज एपिलेप्सी खूप भयानक असते. ही रुग्णाच्या पूर्ण मेंदूवर परिणाम करते. मिरगीचा झटका आल्यानंतर व्यक्तीचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. अशावेळी लोक शुद्धीत नसतात आणि त्यांचे शरीर थरथरु लागते. ते बेशुद्ध होत नाहीत तोपर्यंत शरीर हालचाल करत राहते.
फोकल एपिलेप्सीमध्ये रुग्णाच्या शरीरातील काही भागावर परिणाम होतो. चेहरा, हात किंवा पाय अशा कोणत्या तरी भागात फोकल एपिलेप्सीचा परिणाम दिसून येतो.
एखादा व्यक्तीच्या शरीराची जोरजोराने हालचाल होतेय पण त्याला मिरगी आलीय हे आपल्याला कसे समजणार? यासाठी मिरगीची लक्षणे जाणून घेऊया. बेशुद्ध पडणे, खाली पडणे, हाता पायात झटके येणे, तोंडात झटके येणे, यातील कोणता प्रकार असल्यास ती मिरगीची लक्षणे असू शकतात.
मिरगीची कारणे
मिरगीची अनेक कारणे असू शकतात. काही प्रकरणांमध्ये ते अनुवांशिक असते. तर अनेकदा डोक्याला मार लागणे, संक्रमण किंवा शरीराच्या विकासासंबंधी काही आजार असल्यास त्यामुळेही मिरगी येऊ शकते.
प्रत्येक व्यक्तीला येणारी मिरगी वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रिगर होऊ शकते, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे रुग्णामध्ये मिरगी येण्याचे नेमके कारण बऱ्याचदा कळत नाही. डोक्याला गंभीर जखम झाल्यास किंवा जखमेची खूण राहून गेल्यास लोकांमध्ये मिरगीचे झटके येतात.
यासोबतच तणाव, कमी झोप, नशेच्या औषधांचे सेवन आणि अनुवांशिक कारणांमुळेदेखील मिरगीचे झटके येऊ शकतात. मिरगीचा झटका येण्याचे विशिष्ट वय नाही. ती कोणत्याही वयात येऊ शकते.
मिरगी कमी करण्याचे उपाय
मिरगी येणे ही एक जटिल न्यूरोलॉजिकल कंडीशन आहे. हे ठिक करण्यासाठी डॉक्टरने सांगितलेली औषधे वेळेवर आणि नियमितपणे खायला हवीत. यासोबतच जीवनशैली संभाळायला हवी. तणाव आणि चिंता कमी करायला हवी.
आहार संतुलित ठेवायला हवा. दारु किंवा नशेच्या पदार्थांपासून दूर राहायला हवे. मिरगीच्या रुग्णांनी या गोष्टीची काळजी घेतली तर ते एक चांगले आयुष्य जगू शकतात.