जागतिक हृदय दिवस : `हेल्दी हार्ट`साठी काही महत्त्वाच्या गोष्टी...
हेल्दी हार्टसाठी...
मुंबई : जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लाखोंच्या संख्येत लोक हृदयासंबंधी गंभीर आजाराचा सामना करताना दिसतात. केवळ भारतात प्रत्येक पाचवा व्यक्ती हृदयासंबंधी आजाराने ग्रासलेला असल्याची माहिती आहे. आपल्या शरीरात हृदय एक असा अवयव आहे जो रक्ताभिसरणाचं काम करतो. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पुरवलं जातं आणि शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण योग्य प्रमाणात राहतं. पण आजच्या अतिशय धकाधकीच्या आयुष्यात 'हार्ट अटॅक' आणि 'कार्डियक अरेस्ट' यांसारख्या हृदयाच्या आजारांना अनेक जण बळी पडताना दिसतात. जगभरात हृदयसंबंधी आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस 'वर्ल्ड हार्ट डे' किंवा 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
तणाव आणि हृदयाचा संबंध
तणावाला हृदयाचा शत्रू असं मानलं जातं. त्यामुळे अनेकदा हृदयाच्या आजारांचा थेट संबंध वाढत्या तणावाशी जोडून पाहिला जातो.
आपण कोणत्याही प्रकारच्या तणावात असू तर मेंदू काही वेगळ्याच प्रकारे काम करण्यास सुरुवात करतो आणि हृदयाचं संपूर्ण कार्यच बिघडलं जातं. त्यामुळे ताण-तणाव जितका दूर राहील तिककं हृदय हेल्दी राहण्यास मदत होऊ शकते.
झोप आणि हृदय
झोप न येण्याची समस्या असेल किंवा बिघडलेल्या वेळापत्रकामुळे झोप पूर्ण होत नसेल तर हृदयाबाबत अधिक सजग होण्याची गरज आहे.
ज्यावेळी झोप पूर्ण होत नाही त्यावेळी शरीरात 'स्ट्रेस हॉर्मोन' वाढले जातात. ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही सवय बदलण्याची गरज भासते.
हेल्दी हृदयासाठी...
फास्टफूडच्या जमान्यात हेल्दी हृदयासाठी चटपटीत, तेलकट खाण्यापासून दूर राहणं महत्त्वाचं ठरतं. मद्यपान, धुम्रपानमुळेही हृदयाच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
ग्रीन टी, फायबरयुक्त पदार्थ, मोसमी फळं खाणं हृदयासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे हृदयासोबत शरीरही ताकदी राहतं.
थोडासा थकवाही गरजेचा
दिवसांतून कमीत-कमी अर्धा तास तरी पायी चालणं किंवा कमीत-कमी २० मिनिटांपर्यंत व्यायाम करुन थकणं, आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे आपल्या हृदयाचं पंपिंग योग्यरित्या होण्यास मदत होते आणि हार्ट अटॅकचा धोका एक तृतियांश कमी होतो. संपूर्ण दिवसभरात शारीरिक थकवा कमी जाणवेल, असाच तुमचा दिनक्रम असू द्या. त्यामुळे आपलं हृदय नेहमीच 'हेल्दी' राहण्यास मदत होईल.