मुंंबई : ताणतणाव हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा जणू एक भाग झालाच आहे. मात्र अनेकजण या तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाची मदत घेतात. मद्यपान किंवा सिगारेट पिण्याची सवय आरोग्याला घातक असते. अनेकदा सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम माहित असुनही केवळ व्यसन म्हणून टोबॅकोचं सेवन केलं जातं. कालांतराने आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अनेकजण भानावर येतात. मग हे टोबॅकॉचं व्यसन दूर कसं करायचं या तुमच्या मनातील प्रश्नावर आयुर्वेदामधील काही घरगुती उपाय मदत करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्वगंधा - 


अश्वगंधाची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने धुम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते.  


तुळशीची पानं - 


तुळशीची पानं नियमित सकाळी चघळल्याने अनेक व्हायरल इंफेक्शनपासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. सोबतच तुम्हांला सतत धुम्रपान किंवा टोबॅको सेवनाचं व्यसन लागलं असल्यास त्यापासून तुमची सुटका होण्यास मदत होऊ शकते. 


मध - 


मधाच्या सेवनानेही सिगारेट पिण्याची सवय हळूहळू कमी होते.  


त्रिफला - 


त्रिफळाचं सेवन तंबाखू आणि धुम्रपानाची सवय आटोक्यात ठेवण्यास मदत करते. 


तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं - 


तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय आरोग्याला फायदेशीर आहे. अनेक आजारांपासून तुमची सुटका करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितावह आहे. परंतू टोबॅकोचं सेवन आटोक्यात ठेवण्यासही मदत होणार आहे.  


द्राक्षांच्या बीयांचा अर्क - 


द्राक्षाच्या बीयांचा अर्क फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. धुम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा त्रास टाळण्यासाठी द्राक्षांच्या बीयांचा अर्क मदत करतो. 


दालचिनी - 


गोड- तिखट चवीची दालचिनी इन्फेक्शनचा त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सिगारेट ओढायची इच्छा झाल्यास दालचिनीची एखादी काडी चघळा. यामुळे हळूहळू तुमचं व्यसन कमी होण्यास मदत होईल. 


ओवा - 


धुम्रपानाची इच्छा झाल्यास ओव्याचे काही दाणे चघळा. यामुळे तुमची धुम्रपानाची सवय कमी होईल. अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय