डोकं प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली यशस्वी
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची किमया अचंबित करणारी आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रातही दिसून आला.
इटली : विज्ञान आणि तंत्रज्ञानाची किमया अचंबित करणारी आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रातही दिसून आला.
आजपर्यंत हृद्य प्रत्यारोपण, किडनी, लिव्हर अशाप्रकारचे अवयव प्रत्यारोपण झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, वाचले असेल.. पण आता ही किमया डोक्याच्या प्रत्यारोपणापर्यंत पोहचली आहे.
सुमारे १८ तास प्रयत्न करून जगात पहिल्यांदा ब्रेन डेड व्यक्तीवर डोकं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
इटालियन सर्जन सर्गिओ कॅनावेरो यांनी डोकं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आहे. आता लवकरच ही शस्त्रक्रिया जीवंत व्यक्तीवर करणार असल्याचा मानस डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
रुग्णासाठी ठरू शकते ही शस्त्रक्रिया त्रासदायक
स्पाईन ( पाठीचा कणा), चेतासंस्था आणि रक्त वाहिन्या यांना कनेक्ट करून ही शस्त्रक्रिया केली जाते. मात्र ही शस्त्रक्रिया रूग्णाला फारच त्रासदायक ठरू शकते. कदाचित या पेक्षा मृत्यू बरा.. अशी भावना निर्माण होऊ शकते. कारण प्रत्यारोपित केलेलं डोकं नव्या शरीरासोबत मिळतं जुळतं घेण्याची प्रक्रिया फार वेदनादायी ठरू शकतं.