जगातील पहिलं Unisex condom तयार, वैज्ञानिकांनी सांगितलं वैशिष्ट्यं
आता पुरुष आणि महिला दोघंही वापरू शकणार हे कंडोम! किती असेल किंमत जाणून घ्या
मलेशिया: पुरुषांना किंवा महिलांना प्रत्येकवेळी वेगवेगळं कंडोम निवडण्याची गरज नाही. याचं कारण म्हणजे वैज्ञानिकांनी जगातील पहिलं युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) तयार केलं आहे. या कंडोमचा जगातील कोट्यवधी लोकांना फायदा होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. हे कंडोम पुरुष किंवा महिला कोणीही वापरू शकणार आहेत.
हे युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) स्त्रीरोगतज्ज्ञांनी वैद्यकीय दर्जाच्या मटेरिअलमधून बनवला आहे. या कंडोममध्ये वापरण्यात आलेलं मटेरियल हे सर्जरीनंतर जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी वापरलं जातं त्याचा उपयोग करून तयार करण्यात आलं आहे.
या कंडोमचा महिला-पुरुषांना होणार फायदा
वैज्ञानिकांनी याबाबत दावा केला आहे की याचा फायदा महिला तसेच पुरुषांनाही होणार आहे. या कंडोममुळे (Unisex Condom) सेक्युअल हेल्थ सुधारेल अशी अशा वैज्ञानिकांना आहे. हे कंडोम एकाबाजूने चिकटणारं असणार आहे.
ट्विन कॅटालिस्ट फर्मचे स्त्रीरोगतज्ज्ञ जॉन तांग इंग चिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिसेक्स कंडोम हे इतर नियमित कंडोमसारखेच आहेत. फक्त ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरू शकतात. युनिसेक्स कंडोममध्ये नियमित कंडोमपेक्षा जास्त सुरक्षित आहे असाही दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
Wondaleaf युनिसेक्स कंडोमच्या प्रत्येक पॅकेटमध्ये दोन कंडोम असतील आणि त्याची किंमत 14.99 रिंगिट म्हणजे साधारण 270 रुपये असेल. मलेशियामध्ये 20-40 रिंगिटमध्ये डझनभर कंडोम करता येऊ शकतात.
स्त्रीरोगतज्ज्ञांनी युनिसेक्स कंडोम पोलीयुरीथेनपासून तयार केला आहे. याचं मटेरियल पारदर्शी आहे. हे मटेरियल खूप पातळ आणि रबरासारखं ताणलं जाऊ शकतं. इतकच नाही तर ते वॉटरप्रूफ आणि मजबूतही असतं. त्यामुळे याचा वापर युनिसेक्स कंडोम तयार करताना करण्यात आला आहे.
युनिसेक्स कंडोम वापरण्यासाठी खूप पातळ आहे. जे जाणवणार नाही असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले की, अनेक क्लिनिकल रिसर्च आणि चाचणीनंतर युनिसेक्स कंडोम तयार करण्यात आलं आहे. युनिसेक्स कंडोम डिसेंबरपासून फर्मच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.