मुंबई : बेली फॅट वाढलं की अनेकजण चिंतेत असतात. तुम्ही कधी विचार केलाय का की, पोटाच्या जवळपास चरबी का वाढू शकते. दरम्यान आपल्या शरीरात दोन पद्धतीचे फॅट असतात. एक म्हणजे त्वचेच्या खाली असणारं फॅट आणि विरसल फॅट. मुळात शरीरात फॅट वाढण्याच्या मागे आपली दररोजची लाईफस्टाईल आणि शारीरिक हालचालींचा अभाव कारणीभूत आहेत. जाणून घेऊया बेली फॅट वाढण्यामागे अजून कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.


जीवनशैली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल प्रत्येकाची जीवनशैली ही बैठी आहे. यामुळे बेली फॅट वाढण्यास मदत होते. तुम्ही बसून जे अन्न खातात ते नेहमी स्टोरेजच्या स्वरूपात साठवलं जातं. तुम्ही जितकं जास्त खाता तितक्या लवकर तुमच्या पोटाची चरबी वाढते. यानंतर तुम्ही हे अन्न पचवण्यासाठी पुरेशी मेहनत करत नाही, त्यामुळे हे फॅट साठून बेली फॅट निर्माण होतं.


ताणतणाव


लठ्ठपणा आणि तणाव यांच्यात मोठा संबंध आहे. तणाव वाढला की तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे तुम्ही जास्त अन्न खाता आणि बेली फॅट वाढतं. त्यामुळे पोट कमी करायचं असेल तर तणावमुक्त व्हा. 


मद्यपान केल्याने


दारू साखर वाढवण्याचं काम करते याची तुम्हाला कल्पना आहे का. दारूच्या सेवनानंतर त्याचं अतिरिक्त चरबीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे जास्त दारू पिणं टाळावं जेणेकरून बेली फॅट वाढणार नाही.