मुंबई : नुकताच रिलीज झालेल्या मिमी या सिनेमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या सिनेमात सरोगेट महिलेच्या पोटात वाढणारं बाळ हे डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असल्याचं डॉक्टर सांगतात. मात्र हे बाळ नॉर्मल जन्माला येतं. या सिनेमानंतर लोकांच्या मनात डॉक्टरांच्या अशा रिपोर्ट्सवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न येतोय. तर आज जाणून घेऊया पालकांना मुलाच्या डाऊन सिंड्रोमबद्दल पूर्णपणे कसं कळेल जेणेकरून ते निर्णय घेऊ शकतील.


डाऊन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या शरीराच्या पेशींमध्ये जेनेटिक मैटिरियल क्रोमोसोम असतं. डाउन सिंड्रोम नेहमी गर्भधारणेच्या वेळी होतो. ही अशी वेळ आहे जेव्हा बीज आणि वीर्य यांचे अनुवांशिक बंजल एकत्र येतात. याला ट्राइसमी 21 असेही म्हणतात.


असं का घडतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु हे कोणत्याही जोडप्यासोबतही होऊ शकते. जरी कोणत्याही वयाची स्त्री डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला जन्म देऊ शकते, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळाला जन्म देण्याची अधिक शक्यता असते.


डाऊन सिंड्रोम ही एक मानसिक समस्या आहे ज्यामुळे वाचन, लेखन आणि शिकण्याशी संबंधित समस्या उद्भवतात. या समस्या काही मुलांमध्ये कमी लक्षणांसह आणि काहींमध्ये जास्त दिसतात. म्हणूनच डॉक्टर प्रत्येक गर्भवती महिलेची आणि विशेषत: 35 वर्षांवरील महिलांची तपासणी चाचणी करण्याची शिफारस करतात. स्क्रीनिंग टेस्टमध्ये काही अडचण असल्यास, डॉक्टर पुढील चाचण्या घेण्याचा सल्ला देतात, त्यानंतरच पालकांना कोणताही कठोर निर्णय घ्यावा लागेल की नाही हे निश्चितपणे कळेल.


डाऊन सिंड्रोमच्या टेस्ट टप्प्यांत असतात.


प्रथम एक स्क्रीनिंग चाचणी आहे, ज्याला लेवल टू अल्ट्रासाऊंड देखील म्हणतात. जर बाळाला डाऊन सिंड्रोम असण्याची संभाव्यता असेल, तरच डॉक्टर डायग्नोस्टिक चाचणीची शिफारस करतात. या चाचण्यांपैकी, कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) आणि अम्निओसेंटेसिस अशा चाचण्या असतात ज्या सहसा आपल्याला अचूक उत्तर देतात.


फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग 


एक विशेष अल्ट्रासाऊंड स्कॅन ज्याला न्युचल ट्रान्सल्युसीन्सी (NT) स्कॅन म्हटले जाते ते स्त्रीच्या 11 ते 13 आठवड्यांच्या गर्भधारणेदरम्यान केली जाऊ शकते. हे स्कॅन बाळाच्या मानेच्या मागील बाजूस त्वचेखाली किती द्रव आहे हे मोजते. हे डाउन सिंड्रोमचा धोका ठरवतं.


डबल मार्कर टेस्ट 


ही चाचणी एचसीजी (एचसीजी, ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोफिन) आणि पॅप-ए (पीएपीपी-ए, गर्भधारणेशी संबंधित प्लाझ्मा प्रोटीन) ची पातळी मोजते. जर पोटातील बाळ डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असेल तिच्या रक्तात एचसीजी आणि पॅप-ए या दोन्हीचे असामान्य स्तर आढळतील. 


दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गर्भवती महिलांनी अशा सिनेमांमुळे गोंधळात पडू नये. काहीही तक्रार जाणवल्यास तातडीने चाचण्या करून द्या