Finger in Nose Side Effect : हल्ली नाकात बोट घालण्याची सवय लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला असते. पण नाकात सतत बोटे घालणे ही सामान्य समस्या नाही. या सवयी कधीही कुठे सुरु होतात. ज्या लोकांना या सवयी असतात त्यांना सर्वांसमोर हसू झाल्याशिवाय राहात नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का ? नाकात बोट घालणे  किती महागात पडू शकते? या सवयीमुळे गंभीर आजारा सामोरे जावे लागू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाकात बोट घालण्याची सवय असलेल्यांना अल्झायमर किंवा डिमेन्शिया होण्याचा धोका आहे, असं संशोधकांचे म्हणणे आहे. अल्झायमर हा मेंदूशी संबधित आजार आहे.यात स्मरणशक्ती कमकुवत होते किंवा पूर्णत: संपुष्टात  येते.  या आजारामुळे विचार आणि आकलनावर  परिणाम होतो. हा आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर संबंधित रूग्णाला त्याची दिनचर्या करणंदेखील अवघड होते. 60-65 या वयात हा आजार होण्याचे  प्रमाण  अधिक आहे. 


1. बॅक्टेरियल इन्फेक्शन


नाकामध्ये बोट घातल्याने तणाव व चिंता यांच्याशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतो. स्टॅफीलोकोक्क्स ऑरियस यांसारखे बॅक्टेरिया नाकामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे आजारांच्या (Disease) समस्या अधिक उद्भवतात.


2. जखम होणे -


नाकामध्ये बोट घातल्याने नाकाच्या आतील भागात जखम होऊ शकते. तसेच अनेकदा नाकाच्या आतील भागातील केस तुटतात. ज्यामुळे नाकाच्या आतील भागात सुज येते


3. रक्तस्त्राव होणे -


नाकामध्ये सतत बोट घातल्याने रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचू शकते. ज्यामुळे कधी कधी त्यातून रक्त येते. तसेच आपली त्वचा (Skin) देखील नाजूक होते.


...म्हणून नाकात बोट घालणे टाळावे -


नाकामध्ये साचलेल्या कोरड्या कफाला बूगर्स असे म्हटले जाते. पण ते सतत ते बोट घालून काढल्याने आपल्याला अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यावेळी बाहेरील धुळीचे कण, व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी हा बूगर्स आपल्याला मदत करतो. तसेच यातील बॅक्टेरिया फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही.


अल्झायमरची लक्षणं


  • कामं पूर्ण करण्यात अडचण येणं

  • व्यक्तिमत्व बदलणं

  • लोकं, ठिकाणं तसंच घटनांबद्दल संभ्रम निर्माण होणं