मुंबई : दिवसभरातील कामाचा ताण आणि प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक असते. शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने निरोगी राहण्यासही मदत होते. योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.


शरीराची कामाची प्रक्रिया-


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नुकसान झालेल्या पेशींची भरपाई करणं

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं

  • दिवसभरातील थकवा घालवणं

  • दुसऱ्या दिवसासाठी हृदयाला सशक्त बनवणं


मात्र सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना चांगली 7-8 तासांची झोप मिळत नाही. अशामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने झोप घेण्याऱ्या व्यक्ती आढळतात.


1 जास्त वेळ झोपणाऱ्या व्यक्ती - यामध्ये व्यक्ती 9 तासांपेक्षा अधिक काळ झोप घेतात.


2 कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्ती - यामध्ये व्यक्ती नेहमी 6 तासांपेक्षा कमी झोप घेतात.


पुरेशी झोप घेणं हे शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. कारण जर तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम शरीरासोबत आरोग्यवरही होतो.


  • मरगळ येणं

  • एकाग्रतेचा अभाव

  • निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं

  • चिडचिडेपणा

  • सुस्ती येणं

  • जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ पुरेश्या प्रमाणात झोप मिळत नसेल तर भास होण्याची समस्याही उद्भवते.


शांत आणि पुरेश्या झोपेसाठी खास टीप्स


  • झोपण्याचे तास ठरवा

  • आपल्याला किती काळ झोप आवश्यक आहे याची माहिती करून घ्या. अनेकांना केवळ सहा तासांची झोपही पुरेशी असते

  • बाहेरच्या वातावरणात थोडा वेळ द्या- यामुळे शरीरातील मेलाटोनीन हार्मोन्सचं कार्य सुधारतं. झोपणं आणि झोपेतूऩ उठण्यासाठी मेलटोनिन हार्मोन उपयुक्त असतं

  • झोपताना खोलीमध्ये थंडावा, शांतपणा आणि काळोख असणं गरजेचं आहे

  • झोपताना टीव्ही, मोबाईल, अभ्यास करणं किंवा खाणं टाळा

  • झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर ठरेल


हे करणं टाळा


  • संध्याकाळच्या वेळेला चहा, कॉफी, चॉकलेट किंवा सॉफ्ट ड्रिंक पिणं टाळा

  • झोपण्यापूर्वी दारू पिणं टाळा. यामुळ घोरण्याची किंवा स्लिप अप्नियाची समस्या उद्भवू शकते

  • झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका. यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे झोपण्याआधी दोन तासांपूर्वी व्यायाम करून घ्यावा

  • झोपण्यापूर्वी अतिखाणं, तिखटं आणि गोड पदार्थ खाणं टाळा

  • उपाशी पोटी झोपू नये.

  • दिवसा शक्यतो झोप घेऊ नये कारण यामुळे रात्रीची झोप कमी होऊ शकते