तुम्ही चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावता का? वेळीच सावध व्हा, भारतीयांमध्ये किडनीच्या समस्येत वाढ
Fairness creams side effects: तुम्हीसुद्धा चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण नुकतचं एक संशोधन समोर आलं असून त्यामध्ये किडनीच्या समस्येत वाढ झाल्याचे सामोर आलं आहे.
Fairness creams side effects In Marathi: प्रत्येकाला वाटते की आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं. आपल रंग गोरा असावा असे वाटते आणि हा रंग गोरा दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक उपाय करत असतो. गोरे होण्यासाठीची विविध क्रीम बाजारात उपलब्ध आहेत. गोरेपणाची इतकी क्रेझ असते की स्त्रिया किंवा मुली कोणतं ना कोणत क्रीम किंवा कॉस्मेटिकचा वापर करुन रंग उजळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण याचा परिणाम उलट होतो. कारण यामध्ये केमिक्समुळे त्वचा खराब होते.
रंग गोरा करण्याची हमी देणाऱ्या बाजारात अनेक कंपन्या असल्याचे दिसून आले. जर तुम्ही अशाच गोरे करुन देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीचं क्रीम वापरत असाल तर वेळीच सावध व्हा...कारण भारतात या क्रीममध्ये पारा जास्त प्रमाणात असून याचा किडनीला हानी पोहचते, असा निष्कर्ष नव्या संशोधनात काढण्यात आला. हे संशोधन किडनी इंटरनॅशनल या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
'किडनी इंटरनॅशनल' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उच्च पारा सामग्री असलेल्या फेअरनेस क्रीमचा वापर वाढल्याने मेम्ब्रेनस नेफ्रोथेलाला (MN) होऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या फिल्टरला नुकसान होते. प्रथिनांमुळे गळती होते. MN हा स्वयंप्रतिकार रोग आहे. यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. हा एकप्रकारचा मूत्रपिंडाचा विकार आहे.
फेअरनेस क्रीममध्ये असणारा पारा किडनी फिल्टरसाठी हानिकारक आहे. यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल,” अशी माहिती डॉ. सजीश शिवदास, एमडी, नेफ्रोलॉजी विभाग, एस्टर एमआयएमएस हॉस्पिटल, कोट्टाक्कल, केरळ यांनी एका पोस्टकरुन देण्यात आली.
भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली फेअरनेस क्रीम्स झटपट निष्पक्षतेचे आश्वासन देतात, परंतु कोणत्या किंमतीवर?, असा प्रश्न डॉ. सजीश शिवदास यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' लक्षणे
जुलै 2021 ते सप्टेंबर 2023 दरम्यान नोंदवलेल्या MN च्या 22 प्रकरणांची तपासणी करण्यात आली. ॲस्टर एमआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांमध्ये थकवा, सौम्य सूज आणि लघवीमध्ये फेस वाढणे यासारखी लक्षणे अनेकदा दिसून आली.तसेच या रूग्णांपैकी केवळ 3 रूग्णांमध्ये तीव्र दाह दिसून आला. उर्वरित सर्व रुग्णांच्या लघवीत प्रथिनांचे प्रमाण वाढले होते. एका रुग्णाला सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस झाला. मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाली, परंतु सर्वांमध्ये मूत्रपिंडाचे कार्य जतन केले गेले.