मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातून दु;ख व्यक्त होतंय. दरम्यान नैराश्य, एकटेपणा या प्रश्नांचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. झी २४ तासच्या फेसबुक लाईव्हमध्ये यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मानसोपचारतज्ञ राकेश वरपे यांनी दिली. डिप्रेशन होण्यामागे एकच कारण नाही. म्हणुनच प्रत्येक केसेसमध्ये अचूक कारण शोधणे महत्वाचे ठरते. कारण योग्य उपचार त्यावरच अवलंबुन असतात असे राकेश वरपे यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसशास्त्रामध्ये डिप्रेशन या मनोविकृतीवर अनेक शास्त्रीय पद्धतीचे उपचार सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये सायकोएनालिटिक थेरपी, कॉन्गिटिव्ह थेरपी, बिहेवियरल थेरपी, सोमॅटिक थेरपी ई. हे प्रमुख उपचार पद्धती असल्याचे राकेश वरपे म्हणाले.



३) व्यक्तिमध्ये असलेल्या चांगल्या गुणांची, त्याच्या प्लस पॉइंटची जाणीव करुन देणे. एखाद्या कठीण परिस्थितीचे सकारात्मक पैलू लक्षात आणून देणे, व्यक्तीला असलेल्या ठाम नकारात्मक समजुती कितपत ग्राह्य आहेत हे तपासून पहायला लावणे.
४) बाग काम करणे, आवडीची खरेदी करणे, छंद वर्गाला जाणे, मित्रमंडळीत मिसळणे, चित्र काढणे, योगा करणे, नृत्य करणे, लिखाण करणे, पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे ई छंद जोपासण्यास प्रोत्साहीत केले जाते.