Zombie Virus: रशियातील एका अनपेक्षित घटनेत शास्त्रज्ञांनी धोकादायक झोम्बी व्हायरस (फ्रोझन झोम्बी व्हायरस) पुन्हा जिवंत केला आहे. द स्टेट्समन न्यूज सर्व्हिसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. फ्रेंच शास्त्रज्ञांनी रशियातील एका गोठलेल्या तलावाखाली गाडलेल्या 48 हजार 500 वर्ष जुन्या झोम्बी विषाणूला जिवंत केले आहे. हवामान बदलामुळे  बऱ्याच काळापासून बर्फात गोठलेलेबर्‍याच झोम्बी विषाणूंचा जन्म होऊ शकतो असा इशारा वैज्ञानिकांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोम्बी व्हायरसचे विषाणू बर्फात गोठलेले असतात. डीप फ्रीझमध्ये असताना, ते हायबरनेशनच्या अवस्थेत जातात जे अत्यंत कमी तापमानामुळे त्यांना निष्क्रिय बनवते. जसजसा बर्फ वितळतो आणि तापमान वाढते तसतसे बर्फात वर्षानुवर्षे अडकलेले विषाणू जिवंत होतात. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांना रशियातील गोठलेल्या तलावाखाली हा विषाणू सापडला आहे. हा विषाणू 48 हजार 500 वर्षे जुना आहे आणि इतर प्राण्यांमध्ये आणि अगदी मानवांमध्येही पसरला असल्याचे त्यांनी सांगितले. या विषाणूमध्ये मानवांना देखील संक्रमित करण्याची क्षमता आहे. त्यांनी या विषाणूला Pandora-virus असे नाव दिले आहे.


ग्लोबल वॉर्मिंगमुळे नैसर्गिक आपत्तीच उद्भवतेच पण त्यासोबत अनेक प्रकारचे साथीचे रोग देखील होऊ शकतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात प्रचंड बदल होत आहेत आणि प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे जगाचे तापमान वाढत आहे. यामुळे बर्फाच्छादित पर्वत वितळत असून त्याखाली अनेक विषाणू आणि जंतू गोठले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून मुक्त झालेले विषाणू जिवंत होतील आणि कोरोनाव्हायरससारखे जगभर पसरतील, अशी भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. 


शास्त्रज्ञांनी सुमारे दोन डझन प्राचीन विषाणूंचे पुनरुज्जीवन केले आहे. त्यापैकी झोम्बी हा सर्वात जुना अतिशय धोकादायक आहे. हजारो शतके जगूनही हा विषाणू संसर्गजन्य राहतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाखालील अनेक विषाणू पुनरुज्जीवित झाले आहेत. ज्यात 48,500 वर्षांहून अधिक काळ तलावाच्या खाली गोठलेल्या विषाणूचा समावेश आहे. या विषाणूंमुळे 13 व्हायरस होऊ शकतात. नवीन रोग ज्यासाठी मानवाकडे अद्याप उपाय नाही. रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील बर्मा फ्रॉस्टमधून गोळा केलेल्या प्राचीन नमुन्यांच्या तपासणीत असे दिसून आले. संशोधकांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला.