मुंबई : अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाहीये. अशात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचं म्हटलं जातंय. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात आता लवकरच लहान मुलांसाठी लस येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाव्य तिस-या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी पहिली लस ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची माहिती आहे. झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. 


लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक एकंही लस देशात नव्हती. ही जगातील पहिली डीएनए कोरोना लस असल्याने ती अधिक गुंतागुंतीची आहे. त्यामुळे या लसीची किंमत बाजारात असलेल्या इतर कोरोना लसींच्या तुलनेत थोडी जास्त आहे.


ड्रग्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (DCGI) ने झायडस कॅडिलाच्या तीन डोस लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. XycoV-D ही भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजूर केलेली सहावी लस आहे. आतापर्यंत, स्थानिक पातळीवर उत्पादित कोविशील्ड आणि कोवॅक्सिन व्यतिरिक्त, रशियाची स्पुतनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे.


झायडस ग्रुपचे एमडी डॉ शर्विल पटेल यांनी सांगितलं होतं की, आमच्या कोविड -19 लसीची कार्यक्षमता 66 टक्क्यांहून अधिक आहे आणि डेल्टा प्रकाराविरुद्ध त्याची कार्यक्षमता सुमारे 66 टक्के आहे. ही तीन डोसची लस आहे. पहिल्या डोसनंतर, दुसरा डोस 28 व्या दिवशी आणि तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जातो.