नवी दिल्ली : मोदी सरकारने देशाच्या सर्व पोस्ट ऑफिसला बँक बनवण्यासाठी पाऊल टाकलं आहे. इंडियन पोस्ट ऑफिस लवकरच पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. आयपीपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसिंह यांनी याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक समावेशकतेबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. एपी सिंग यांनी माहिती दिली की भारतातील पोस्ट ऑफीस आता पेमेंट बँक होणार आहे. देशाच्या सर्व 1.55 लाख पोस्ट ऑफिसमध्ये भरणा करणे सोपं होणार आहे. एपीसिंह यांच्या मते, 2018 च्या अखेरीस, त्यांचे सर्व तीन लाख कर्मचारी ही सेवा देऊ शकतील. ही भारतातील सर्वात मोठी दुसरी पेमेंट बँक असेल.


मार्च 2018 पर्यंत आमचे पोस्ट बँक देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात असेल आणि 2018 च्या अखेरीस देशातील सर्व 1.55 लाख टपाल कार्यालयांमध्ये आणि ग्रामीण पोस्ट ऑफिसच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे यासाठी सर्व उपकरण मिळतील. जानेवारीच्या सुरुवातीला खाजगी क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने एअरटेल पेमेंट बँक सुरू केले होते. याच्या माध्यमातून ते देशभरातील 2.5 लाख जणांपर्यंत पोहोचले.