Indian Railway : भारतीय रेल्वे हा देशातील सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. देशात दररोज हजारो गाड्या धावतात. रेल्वे प्रशासनानं एखादी ट्रेन (train cancel) वळवली किंवा रद्द केली किंवा वेळापत्रक बदलले. अशातच आता 1 ऑक्टोबरपासून काही ट्रेनच्या वेळापत्रकात (train timetable) बदल होणार आहे. यामध्ये काही गाड्यांचे थांबे वाढवले आहेत. यासोबतच काही गाड्यांच्या वेगात दहा मिनिटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांच्या (railway passanger) सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  (1 october many trains will be expanded new trains will run)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 ऑक्टोबरपासून या गाड्यांच्या वेळेत होणार बदल :-


आग्रा कॅंट - नवी दिल्ली इंटरसिटी, आग्रा कॅंटवरून सकाळी 6 ऐवजी 5.45 वाजता.
आग्रा कॅंट - मैनपुरी मेमू, आग्रा कॅंटवरून 4.35 ऐवजी 4.15 वाजता.
कोलकाता-आग्रा कॅंट एक्स्प्रेस आग्रा कॅंट येथे सकाळी 10.40 ऐवजी 10.15 वाजता पोहोचेल.
मथुरा-कासगंज एक्स्प्रेस मथुरा जंक्शनवरून पहाटे 5.40 ऐवजी 5.45 वाजता सुटेल.
अल्वर मथुरा एक्सप्रेस, मथुरा जंक्शनवरून 4.50 ऐवजी 4.55 वाजता


या गाड्यांचा विस्तार


प्रयागराज-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस: ​​आठवड्यातून चार दिवस सीकर-चुरु-रतनगड मार्गे 
गोरखपूर-हिसार गोरखधाम एक्सप्रेस: ​​भटिंडा पर्यंत दररोज
अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस, साप्ताहिक ट्रेन आसनसोलपर्यंत वाढवली


ट्रेन टर्मिनल बदलणे


प्रयागराज-उधमपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस: ​​ही ट्रेन आता प्रयागराजऐवजी सुभेदारगंज स्थानकावरून धावेल.


या ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे


छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे साप्ताहिक ट्रेन आहे. 1 नोव्हेंबरपासून ही ट्रेन चंदारी-कानपूर सेंट्रल लोको केबिन-कानपूर गुड्स मार्शल-गोविंदपुरी-भीमसेन ऐवजी चंदारी-कानपूर सेंट्रल-कानपूर गुड्स मार्शल-गोविंदपुरी-भीमसेन मार्गे धावेल. ही गाडी गोविंदपुरी स्थानकावरही थांबेल.


या नवीन गाड्या धावणार आहेत


इंदूर-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे. दिल्ली-सोगरिया सुपरफास्ट एक्स्प्रेस दररोज धावेल. खजुराहो-टिकमगड एक्स्प्रेस ही ट्रेनही दररोज धावणार आहे. तर कानपूर ब्रह्मावर्त मेमू स्पेशल ट्रेन दररोज धावेल. फाफुंड-इटावा मेमू दररोज धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.