औरंगाबाद : महापालिकेच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एआयएमआयएमचा नगरसेवक सैयद मतीन राशिद याला 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटीज ऑफ स्लमलॉड्र्स, बुटलेगर्स, ड्रग ऑफेंडर्स आणि डेंजरस पर्सन अॅक्ट 1981 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मागील आठवड्यात राशिदने वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी या नगरसेवकाची चांगलीच धुलाई केली होती.


1 वर्षाची शिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा रक्षकांनी राशिदची या दरम्यान सूटका केली. राशिदने भाजप नगरसेवकांच्या अटकेची मागणी केली आहे. मंगळवारी राशिदला या प्रकरणात जामीन मिळाला होता. पण थोड्याच वेळात सिटी चौक पोलीस स्टेशनची एक टीम राशिदच्या घरी पोहोचली आणि राशिदला हरसूल जेलमध्ये घेऊन गेली. राशिदला पोलीस कस्टडीमध्य़े ठेवण्यात आलं. यानंतर राशिदला 1 वर्षासाठी पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.


राष्ट्रगीतालाही केलेला विरोध


औरंगाबादचे कमिश्नर चिरंजीव प्रसाद यांनी म्हटलं की, राशिदच्या विरोधात ज्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यावर अजून दुसरा कोणता पर्याय नव्हता. राशिद या आधी देखील वादात होता. याआधी त्याने सभागृहात राष्ट्रगीताला विरोध केला होता.


MIM कडून बचाव


एआयएमआयएम नेते सैयद इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, राशिदच्या विरोधात फक्त 2 आरोप आहेत. यामागे पूर्णपणे राजकारण आहे. आमच्या पक्षाने वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली आहे. हे आमच्या पक्षाचं प्रकरण होतं. भाजपच्या नगरसेवकांनी राशिदला वाईट पद्धतीने मारहाण केली.