नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2019-20 चं अंतरिम बजेट आज संसदेत सादर केलं. प्रत्येक वर्गाला सरकारने लक्षात ठेवून हे बजेट बनवलं आहे. 'सबका साथ, सबका विकास' अजेंडा घेत सरकारने आज अनेक घोषणा केल्या. निवडणुकीचं वर्ष असल्याने बजेटमध्ये लोकांना खूश करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. सरकारने मध्‍यम वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या. आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे त्यांच्या विभागाचा भार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी आज बजेट सादर केलं. आजच्या बजेटमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सरकारने इनकम टॅक्‍स स्‍लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. आता 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही. याआधीय याची मर्यादा 2.5 लाख होती. यामुळे 3 कोटीपेक्षा अधिक मध्‍यम वर्गच्या कुटुंबाला याचा फायदा होणार आहे.


2. सरकारने स्‍टँडर्ड डिडक्‍शन 40 हजारावरुन 50 हजार केले आहे. सरकारने बँकामध्ये एफडीच्या व्याजवर 40 हजारापर्यंत कोणताच टॅक्स लागणार नाही अशी घोषणा केली आहे. याची सीमा आधी 10 हजार रुपये होती.


3. अर्थमंत्री यांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. 2 हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहेत. ही योजना 1 डिसेंबरपासून लागू झाली असून वर्षात 3 टप्प्यात हे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. याचा जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


4. गायींसाठी सरकारने कामधेनु योजना सुरु केली आहे. मत्स्य व्यवसायासाठी कर्जावर 2 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.


5. सरकारने नोकरी किंवा मजदूरांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. वेतन आयोगाची शिफारशी लवकरच लागू करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेंशन योजना आणखी सरळ करण्यात आली आहे.


6. सरकारने 21 हजार मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी7 हजार रुपये बोनस म्हणून देण्यात येणार आहे. सोबतच ग्रॅच्‍युटीची सीमा 20 लाख करण्यात येणार आहे.


7. प्रधानमंत्री श्रमयोगी मान धन योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. याचा फायदा 15 हजार कमवणाऱ्या लोकांना होणार आहे. कामगाराच्या आकस्मिक मृत्‍यू झाल्यास त्याला 6 लाख रुपये मदत म्हणून देखील दिले जाणार आहे.


8. सरकारने अनेक महत्त्वाच्या घोषणा करत ज्यांचा ईपीएफ कापला जातो त्यांना 6 लाखांचा विमा देण्याची घोषणा केली आहे.


9. महिलांसाठी सरकारने उज्वला योजनेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 8 कोटी महिलांना एलपीजी कनेक्‍शन दिले जाणार आहे. याआधी 6 कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन मिळालं आहे. 


10 बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांनी हरियाणामध्ये 22 व्या एम्स हॉस्पिटल बनवणार असल्याची घोषणा केली आहे. सोबतच मार्च 2019 पर्यंत सगळ्यांच्या घरापर्यंत वीज पोहोचवली जाईल. अशी देखील घोषणा सरकारने केली आहे.