मुंबई : नवीन नवीन तंत्रज्ञान आल्याने नोकरीच्या नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय पगार देखील ८ ते १० टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे येणाऱ्या वर्षात देखील १० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर काही क्षेत्रांमधील पगार काही प्रमाणात वाढणार असल्याचं मत देखील त्यांनी मांडलं आहे.


निवडणुकीआधी सतर्कता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता पाहता रोजगार देणाऱ्या कंपन्या देखील सतर्क आहेत. कारण या निवडणुकीआधी रोजगार हा मोठा मुद्दा म्हणून समोर आला आहे. जीडीपी वाढत असला तरी रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. नवीन वर्षात १.२ कोटी रोजगार निर्माण होईल असा देखील दावा केला जात आहे.


तज्ज्ञांच्या मते, देशातील रोजगार पुन्हा एकदा पटरीवर येत आहे. २०१६ मध्ये नोटबंदी आणि २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्याने याचा परिणाम रोजगारावर झाला. पण आता २०१८ मध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


मार्च-एप्रिलमध्ये निर्माण होणार संधी


सोसायटी फॉर ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटचे निशिथ उपाध्याय यांच्या मते, लोकसभा निवडणुकीत रोजगार हा फार मोठा मुद्दा असणार आहे. त्यामुळे २०१९ मध्ये रोजगार देणाऱ्या कंपन्या देखील सतर्क आहेत.


मोठ्या गुंतवणुकीच्या शक्यता


मानव संसाधन सेवा पुरवणारी रँडस्टॅड इंडियाचे प्रमुख पॉल ड्यूपुइस यांनी म्हटलं की, आयटी क्षेत्रात २ वर्षानतंर नोकरी देण्याबाबत उत्साहाचं वातावरण असेल. आयटी क्षेत्रात कुशल आणि प्रतिभावान लोकांची उपलब्धता आणि ई-वाणिज्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक यामुळे हे शक्य होईल. पण बँकिंग, आर्थिक सेवा आणि दूरसंचार क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती खराब आहे.