इंदूर : वडिलांनी फोन काढून घेतल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव खुशी असे आहे. ती १०वी इयत्तेत शिकत होती. इंदूरच्या चंदन नगरमध्ये ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु याप्रकरणी पोलीस कोणत्याही प्रकारची तसदी घेत नसल्याचे चित्र समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी रात्री उशीरापर्यंत खुशी मोबाइलवर गेम खेळत होती. म्हणून वडिलांनी तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि झोपण्यास सांगितले. त्यानंतर खुशीचे आई-वडील आणि नातेवाईक कोणत्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले तेव्हा खुशीने खोलीत फाशी घेवून आपले जीवन संपवले. 


त्यानंतर वडिलांनी खुशीच्या भावाला घरून हेडफोन्स आणण्यास पाठवले. खुशी तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच, त्याने वडिलांकडे धाव घेतली. त्यानंतर वडील आणि नातेवाईक ताबडतोब घरी पोहोचले. 


तेव्हा खुशी फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी खुशीला मृत घोषित केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. परंतु तिच्या शवविच्छेदनासाठी पोलिस विलंब करत असल्याचे समोर आलं आहे.


सध्या एका व्यक्तीचं शवविच्छेदन सुरू आहे. त्यानंतर खुशीचं होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तर रूग्णालयाबाहेर नातेवाईक तिच्या मृतदेहाची प्रतिक्षा करत आहेत.