भारतात ३ दिवसात १० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या साथीने एक भयानक रूप धारण केले आहे. मेच्या सुरूवातीपासूनच, देशातील कोरोना विषाणूच्या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 50 हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत, तर एकट्या मुंबईत 10 हजार पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
७ मे २०२० पर्यंत
एकूण रुग्ण : 52952
उपचार घेत असलेले रुग्ण : 35902
बरे झालेले रुग्ण : 15266
एकूण मृत्यू : 1783
गेल्या तीन दिवसात भारतात दहा हजाराहून अधिक रुग्ण वाढले आहेत. ही एक भयानक बाब आहे. आपण गेल्या तीन दिवसांची संख्या पाहिली तर
4 मे - 3656
5 मे - 2934
6 मे - 3561
देशात दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या कशी वाढत आहेत हे मागील 3 दिवसात लक्षात येतं.
जर आपण राज्यांविषयी चर्चा केली तर भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 16 हजारांच्या वर गेली आहे. फक्त मुंबईत 10 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एकूण 651 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गुजरात, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक दिसून आला आहे.
भारतातील 5 सर्वाधिक प्रभावित राज्ये
महाराष्ट्रात 16758 प्रकरणे, 651 मृत्यू.
गुजरातमध्ये 6625 प्रकरणे, 396 मृत्यू
दिल्ली 5532 प्रकरण, 65 मृत्यू
तामिळनाडूमध्ये 4829 प्रकरणे, 35 मृत्यू
राजस्थानमध्ये 3317 प्रकरणे, 92 मृत्यू
30 जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर, मार्चमध्ये भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. 24 मार्च रोजी देशात लॉक़डाऊन लागू करण्यात आला. जो 17 मेपर्यंत सुरू राहणार आहे.