नवी दिल्ली : बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बीएसएफ)ने 10,000 किलो पेक्षा जास्त वजनाचा अंमली पदार्थांचा साठा, 49.44 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि 1.20 लाख गायी पकडल्या आहेत.


सर्वात सक्षम सीमा सुरक्षा यंत्रणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1965 साली बॉर्डर सेक्युरिटी फोर्सची स्थापना झाली होती. त्यात 2.5 लाख कर्मचारी असून सीमेचं संरक्षण करणारी ही देशातली सर्वात मोठी यंत्रणा आहे. 


अंमली पदार्थांची तस्करी


तस्कारांना बीएसएफने चांगलाच दणका दिला आहे.
बीएसएफने 9,807 किलो अंमली पदार्थ भारत-बांगलादेश सीमेवर आणि 439.21 किलो अंमली पदार्थ भारत-पाकिस्तान सीमेवर डिसेंबर 2016 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये  पकडला आहे. बीएसएफचे संचालक, जनरल के के शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


बनावट नोटा जप्त


त्याचबरोबर बीएसएफने पूर्व सीमेवरून 49.44 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जवळपास 1.20 लाख गायीसुद्धा जप्त केल्या आहेत. भारताच्या सीमा रक्षणासाठी तत्पर असल्याचं बीएसएफने दाखवून दिलं आहे.