श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या रामबन येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ भाविक जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर ही घटना घडली आहे जम्मूवरुन पेहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.