जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनाने घेतला ११ जणांंचा बळी
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात झालेल्या हिमस्खलनाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतलाय.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात झालेल्या हिमस्खलनाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतलाय.
मदतकार्य सुरु
हिमस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये मदतकार्य सुरु असल्याची माहिती अधिका-यांनी दिलीये. ही घटना घडली त्यावेळ 8 जण गाडले गेले होते त्यानंतर हा आकडा वाढून 11वर गेल्याची माहिती काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी दिलीये.
सीमा रस्ते संघटनेचे
मृतांमध्ये सीमा रस्ते संघटनेच्या अधिका-याचाही समावेश आहे. बीआरओच्या तीन अधिका-यांना बाहेर काढण्यात यश आलंय. दरम्यान अजूनही या भागात मदतकार्य वेगानं सुरु असू दाट धुक्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या मदत कार्यात अडथळे येत आहेत.