हैदराबाद: एका दगडाच्या खाणीत स्फोट होऊन ११ कामगार ठार तर, ४ गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथे घडली. चारही जखमींना अलुरू या जवळच असलेल्या सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि एनडीआरएफ आणि अग्निशमन दालचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून, मदत आणि बचावकार्य सुरू झाल आहे.


स्फोटाचे कारण अस्पष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्फोटात जखमी झालेल्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीने मिळावी यासाठी सरकारने प्रशासनाला आदेश दिले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस त्याचा तपास घेत आहेत.



मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुख:


दरम्यन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.