SBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका
डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली : डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. तर, अनेकदा यामुळे गैरव्यवहार झाल्याचे प्रकारही समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, अँड्रॉईड युजर्सला अलर्ट करण्यात आलं आहे. जर तुम्हीही अँड्रॉईड युजर आहात आणि बँकेचे व्यवहार करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करता तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.
ही बातमी वाचून तुम्ही येत्या काळात तुमच्या बँक खात्याच्या माध्यमातून होणारं पैशांचं नुकसान टाळू शकता. जर तुमचं अकाऊंट SBI, ICICI किंवा HDFC बँकेत आहे आणि तुम्ही संबंधित बँकेचं मोबाईल अॅप डाऊनलोड केलं आहे तर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे.
मोबाईल अॅप वापरताना काळजी घ्या
या बँकांचे मोबाईल अॅप वापरताना काळजी घ्या अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. ग्लोबल IT सिक्युरिटी कंपनी क्विक हिल सिक्युरिटी लॅबने एक अँड्रॉईड बँकिंग ट्रोजन व्हायरसबाबत माहिती दिली आहे.
तुमची वैयक्तिक माहिती होऊ शकते चोरी
या खरतनाक ट्रोजनने २३२हून अधिक बँकिंग अँड फायनान्स अॅपला टार्गेट केलं आहे. याचं नाव अँड्रॉईड.बँक.ए९४८० (Android.banker.A9480) आहे. हा व्हायरस तुमची गुप्त माहिती चोरी करण्यासाठी एसएमएस आणि फेक नोटिफिकेशनचा वापर करत आहे. हा व्हायरस तुमचं इंटरनेट बँकिंग लॉगइन आयडी आणि पासवर्डची माहिती चोरी करु शकतं.
१२ बँकिंग अॅपला धोका
रिपोर्टनुसार, फेक फ्लॅश प्लेअर अॅपच्या माध्यमातून तुम्हाला नुकसान पोहचवू शकतं. या व्हायरसने HDFC, ICICI, IDBI, SBI आणि अॅक्सिस बँकेसोबतच इतरही बँकेच्या अॅपला टार्गेट केलं आहे. रिपोर्टमध्ये १२ मोठ्या बँकेंचे अॅप असल्याचं म्हटलं आहे.
बँकिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सला टार्गेट केल्यानंतर हा व्हायरस ट्रोजनच्या माध्यमातून फेक नोटिफिकेशन लॉगिन आणि पासवर्ड इंटर करण्याचे निर्देश देतं. याच्या माध्यमातून हॅकर तुमच्या लॉगइनच्या संबंधित माहिती सहज चोरी करु शकतात.
यामुळे युजर्सला सल्ला देण्यात येत आहे की, थर्ट पार्टी अॅप, एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून येणाऱ्या कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नका.