भोपाळ : मध्‍य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका २४ वर्षाच्या महिलेने ११ व्या पतीला सोडून १२ व्या पतीसोबत विवाह केला. ही गोष्ट महिलेच्या ११ व्या पतीनेच उघडकीस आणली. त्याने आरोप केला आहे की, पैशांसाठी त्याच्या सासु सासऱ्यांनीच तिचा विवाह १२ व्या व्यक्तीसोबत करुन दिला. खरगोनमधील बडगाव गावातला हा प्रकार आहे.


पीडित विक्रमने त्याची पत्नी आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार घेऊन तो कलेक्टर ऑफिसला पोहोचला. त्याने दावा केलाय की ३ वर्षापूर्वी घुघरियाखेडीमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय सेवंतीबाईसोबत त्याचा विवाह झाला होता. पण काही दिवसांपूर्वी ती घर सोडून निघून गेली.
 
एका हिंदी चॅनेलने दिलेल्य़ा बातमीनुसार, विक्रमने म्हटलं की, सेवंती घरी नाही हे माहिती पडल्यानंतर त्याने तिचा शोध सुरु केला. या दरम्यान कळालं की तिचे याआधी १० विवाह झाले आहेत. पैशांसाठी हे सगळं सुरु असल्याचा आरोप विक्रमने केला आहे.
 
विक्रमने म्हटलं की, त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली पण यावर कोणतीही कारवाई नाही झाली. त्यानंतर तो कलेक्टर ऑफीसला पोहोचला. असं त्याने म्हटलं आहे.