नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढल्याने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT)ने काही अटींसह ऑड इव्हन लागू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.दरम्यान एनजीटीच्या या निर्णयानंतरही दिल्ली सरकारने नोव्हेंबरपासून ऑड इव्हन लागू न करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यानही लोकांना ऑफीसला जायला त्रास होतच होता.


समस्येवर उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन बंगळूरमधील १३ वर्षाच्या अक्षत मित्तलने लोकांच्या या समस्येवर उपाय शोधत लाखोंची कमाई केली. २०१६ मध्ये ऑडइव्हन लागू होण्या दरम्यान तिने ऑडइव्हन.कॉम (oddeven.com)लॉंच केली होती. त्यावेळी अक्षत हा नोएडाच्या एमिटी स्कूलमध्ये ९ वीत शिकत होता.


पूलिंगसाठी रिक्वेस्ट 


या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना कार पूलिंगची सुविधा मिळू लागली. या वेबसाईटवर यूजर ने रजिस्ट्रेशन केल्यानंतर सोप्या सहतेने कार पूलिंगची व्यवस्था होऊ लागली. oddeven.com च्या माध्यमातून जर तुमच्याकडे ऑड नंबरची गाडी असेल तर तुम्ही इव्हन नंबरच्या कारकडे तर इव्हन नंबरची कार असल्यास ऑड नंबर गाडीकडे पूलिंगसाठी रिक्वेस्ट करु शकता. 


दोघांमध्ये झाली डील


वेबसाइटवर रिक्वेस्ट आल्यानंतर एकाच रुटवरुन जाणारे ऑड आणि ईव्हन नंबरच्या कारचे मालक वेगवेगळ्या दिवशीही एकत्र जाऊ लागले. जानेवारी २०१६ नंतर एप्रिलमध्ये पुन्हा ऑड इव्हन सिस्टिम सुरु करण्यात आले. तेव्हा कारपूल येथील अॅप ओराहीडॉटकॉम (orahi.com) ने oddeven.com ला संपर्क केला आणि वेबसाईट विकत घेण्याची ऑफर दिली. यानंतर दोघांमध्ये डील फायनल झाली.


अक्षत बनला सल्लागार


या दोघांमध्ये नेमकी किती रुपयांची डिल झाली याची अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. पण या मिळणाऱ्या रक्कमेव्यतिरिक्त अक्षतला ओराहीडॉटकॉमच्या सल्लागार समितीत नेमण्यात आले.  


सरकारने केला उल्लेख


त्यानंतर  oddeven.com ची देखरेख करण्याची जबाबदारी orahi.com ने घेतली. ऑड इव्हन लागू झाल्यानंतर दिल्ली सरकारने वेगवेगळ्या भागातील जाहिरातीत या वेबसाईटचा उल्लेख केला होता.