LIC Fraud Case: एका महिलेने अशी शक्कल लढवली आहे की सारेच चकीत झाले आहेत. पती जिंवतच असताना तिने त्याला मृत घोषित केले आणि त्या माध्यमातून एलआयसीतून (LIC Policy) जवळपास 15 लाख काढले आहेत. महिलेला पैशांची गरज असल्याचे तिने हा कट रचला. या प्रकरणात एलआयसीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महिलेला अटक केली आहे. महिला बिहार येथील गयामध्ये भाड्याच्या घरात राहत असून ती गेल्या अडीच वर्षांपासून फरार होती. तिला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. LIC Fraud Case


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 4 एप्रिल 2021 रोजी घडली होती. त्यावेळी एलआयसीचे तात्कालीन शाखाप्रमुख सुरेश कुमार सैनी यांनी फसवणुकीची तक्रार लहेरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सैबी देवी असं या आरोपी महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव सुनील कुमार असं आहे. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा एक आरोपी एलआयसी एजेंट अनिल कुमारला अटक करण्यात आले होते. आरोपी महिलेच्या पतीने सुनील कुमारकडून वन टर्म इन्शूरंन्स पॉलिसी घेतली होती. ज्याची एकूण रक्कम 15 लाख इतकी होती. एलआयसीची पॉलिसी 18 डिसेंबर 2016 रोजी सुरू झाली होती व 28 डिसेंबर 2031 रोजी पूर्ण होणार होती. या पॉलिसीमध्ये नॉमिनी त्यांची पत्नी सैबी देवी होती. 


पत्नी सैबी देवीने 2020मध्ये पतीचा मृत्यू झाल्याचा दावा करुन पॉलीसीवर दावा केला. मृत्यू प्रमाणपत्र दाखवून अन्य कागदपत्रेदेखील जमा केले होते. 27 नोव्हेंबर 2020मध्ये एलआयसीकडून 15 लाखांची रक्कम महिलेच्या खात्यात जमा करण्यात आली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एलआयसी एजंटच्या मदतीने ही फसवणूक केली आहे. सुनील कुमार नावाच्या एका पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला होता. आरोपी सैबी देवीच्या पतीचे नावदेखील सुनील कुमार होते. याचाच फायदा घेऊन एलआयसी एजंट अनिल कुमारसोबत मिळून कट रचला. मृतक सुनील कुमारच्या के प्रमाणपत्राचा वापर करुन पॉलिसीची रक्कम महिलेच्या खात्यात जमा केली. मात्र, या प्रकरणाचा खुलासा होताच एलआयसीने रक्कम पुन्हा परत घेतली होती. तर, गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला फरार झाली होती. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महिलेला अटक करण्यात आली आहे.