लोकसभेच्या 14 गोंधळी खासदारांचं निलंबन, काँग्रेसच्या 5 आमदारांचा समावेश
सभागृहातील कामकाजात अडथळा घातल्याप्रकरणी लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतील एका खासदाराचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 5 खासदारांचा समावेश आहे.
विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सभापतींनी गोंधळी खासदारांची नावं दिल्यानतंर 15 विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव लोकसभेत मंजूर करण्यात आला. निलंबित 15 खासदारांपैकी पाच खासदार काँग्रेसचे आहेत.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या पाच खासदारांना निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. "सभागृहाने टीएन प्रतापन, हिबी एडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस कुर्याकुस यांच्याकडून सदनाचा आणि अध्यक्षाच्या अधिकाराचा अवमान करून गैरवर्तन केलं आहे. अध्यक्षांनी त्यांची नावंही दिली आहेत. उर्वरित सत्रासाठी त्यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी मी खालील निवेदन करत आहे,” असं ठरावात लिहिलं होतं.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं राज्यसभेतून अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबन झाल्यानंतर, विरोधी सदस्यांवर केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या यादीत आता आणखी 15 खासदारांचा समावेश झाला आहे. डेरेक ओब्रायन यांनी दोन तरुण लोकसभेत घुसल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीवर चर्चा करण्याची मागणी केली होती. विरोधी नेत्यांनी यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.