अहमदाबाद : गुजरातच्या पोरबंदर येथील नौदल तळावर गेल्या चार दिवसांत १६ प्रशिक्षणार्थी खलाशींमध्ये कोविड - १९ (Coronavirus) संसर्गाची पुष्टी झाली आहे. एका अधिका्याने शुक्रवारी ही माहिती दिली. यानंतर एकच नौदलात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पोरबंदरमध्ये सैनिक रुग्णालय नसल्यामुळे या सर्वांना जामनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य संरक्षण प्रवक्ते पुनीत चड्डा यांनी दिली.  हे प्रशिक्षणार्थी नौदल पोरबंदर नौदल तळावर आहेत. पहिल्या आठ नाविकांनी संसर्गाची पुष्टी केली होती आणि त्यांना जामनगरच्या सैनिक रुग्णालयात दाखल केले होते, असे ते म्हणालेत.


सापडलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच शोधून काढताना अधिकाऱ्यांनी तळावरुन अन्य काहींचे थ्रोड सॅबचे नमुने घेतले आणि तपासणी केल्यावर इतर आठ नाविकांनाही संसर्ग झाल्याचे आढळले. सर्वांना जामनगर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.


 नौदल तळाला संक्रमणमुक्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे आणि काही कर्मचार्‍यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले लआहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.