Delhi Murder Case Update: दिल्लीत झालेल्या (Murder Case) हत्याकांडामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. भररस्त्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करण्यात आले होते. माथेफिरु आरोपीने साक्षीवर तब्बल ४० वार केले होते. त्यानंतर चार वेळा तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. साहिल (Sahil) असं आरोपीचे नाव आहे. हत्याकांडानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


साहिलला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली हत्याकांडातील आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच, या प्रकरणात सखोल चौकशी करुन आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करु, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी याबरोबरच गुन्हा घडत असताना नागरिकांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकरणात गुन्हा घडत असताना नागरिकांनी समोर येऊन मदत करणे गरजेचे आहे, असं दिल्ली कमिश्नर दीपेंद्र पाठक यांनी म्हटलं आहे. जर या प्रकरणात लोकांनी पुढे येऊन पिडीतेला मदत केली असती तर तिचा जीव वाचला असता, असं त्यांनी म्हटलं आहे. 


लोकं फक्त बघत होते...


सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहिल पिडीतेवर वार करत असताना घटनास्थळी लोक ये-जा करत होते. गल्ली गजबजलेली होती. साहिल तिच्यावर वार करत असताना लोकं बघत बघत पुढे जात होते. मात्र कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा पोलिसांना याबाबत माहितीही कळवली नाही. लोकं दुर्लक्ष करुन पुढे निघून जात होते. लोकांच्या या भूमिकेवरुनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 


तरुणीवर चाकुने ४० वार, नंतर दगडाने ठेचून ठार केले, दिल्लीत भररस्त्यात थरार 


सीसीटीव्ही समोर


दिल्ली पोलिस कमिशनर दीपेंद्र पाठक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत लोकांना पुढे यायचे आवाहन केलं आहे. अशा घटना घडत असताना लोकांनी नेहमीच पुढे येऊन मदत करावी, असं आवाहन वारंवार केलं जातं. गुन्हा घडत असताना आरडाओरडा करुन सतर्क करा केवळ तिथे उभं राहून गुन्हा घडताना पाहू नका, असं पोलिसांकडून आवाहन केले जाते. सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यात स्पष्टपणे दिसतंय की लोकं गुन्हा घडताना पाहून आरामात दुर्लक्ष करुन पुढे निघून जात आहेत. जर वेळीच लोकांनी साहिलला अडवलं असतं तर पीडितेचा जीव वाचला असता, अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली आहे.  


पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या