आसाम : आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू पियाल्याने १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी दारू पियालेल्या ४७ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गोलाघाटमधील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून विषबाधा झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.  



गोलाघाटमधील सरकारी रूग्णालयाचे डॉक्टर दिलीप राजवंशी यांनी एकदिवसापूर्वीच याच भागातील ४ जणांचा विषारी दारूने मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा १३ जणांचा विषारी दारूने बळी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाकडून विषारी दारूप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.