Sister Kills Cousin Brother: छत्तीसगढच्या रायगढ (Raigad News) जिल्ह्यात ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येने खळबळ माजली होती. पोलिसांनी आता या घटनेचा खुलासा केला आहे. आरोपीने मुलाचा धारदार शस्त्राने खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर करताच आश्चर्य व्यक्त केले आहे. (Crime News In Marathi)


11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ मे रोजी गावातील सरकारी शाळेत एका ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. मुलाचे नाव पृथक साहू असं होतं. पृथकचा मृतदेह मिळताच गावात एकच खळबळ उडाली होती. मृतदेह पाहून गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना या बाबत सूचना दिली होती. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी उपस्थित होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तपास करताना पोलिसांना पृथकचे वय ११ वर्ष होते, याची माहिती मिळाली. तसंच, तो इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. 


खेळायला बाहेर पडला तो परतलाच नाही


पृथकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २४ मेरोजी तो घरातून खेळायला जातो म्हणून बाहेर पडला मात्र तो परतलाच नाही. खूप शोधाशोध करुनही पृथकबाबत काहीच पत्ता लागला नाही. अखेर २५ मे रोजी त्याचा मृतदेहच सापडला. सुरुवातीला पोलिसांना या हत्या प्रकरणात कोणताही पुरावा सापडला नव्हता. त्यामुळं ही केस सोडवण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. 


बहिणीच्या प्रेम-प्रकरणाबाबत कळलं, भावाने दिली अशी शिक्षा की वाचून अंगाचा थरकाप उडेल


डॉग स्कॉड तैनात


पोलिसांनी या हत्येचा गुंता सोडवण्याकरिता डॉग स्कॉडमधील रुबी या श्वानाला पाचारण केले होते. घटनास्थळी पोलिसांनी कसून शोध घेतला असता हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले धारदार हत्यार मिळेल. रुबीने त्या हत्याराचा वास घेतला व त्यानुसार तो पृथकच्या काकाच्या घरी जाऊन पोहोचला. तिथे पृथकची मोठी बहिण उमाच्या जवळ रुबी घुटमळत होती. वारंवार रुबी उमाकडे पाहून भुंकत होती. 


रागात 12 वर्षांच्या मुलाने घर सोडले, दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह, गळ्यात दोरी; गूढ कायम


पोलिसांना संशय आला अन् आरोपी पकडला 


रुबीच्या वागण्यामुळं पोलिसांना संशय आला आणि त्यांनी उमाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलिस चौकीत आणले तेव्हा तिने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबुल केला आहे. चौकशीत तिने म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वी पृथकच्या घरातून दहा हजार रुपये चोरी झाले होते. त्या घटनेनंतर तिच्या काकाचे कुटुंबीय तिला चोर म्हणून हिणवत होते. याचाच बदला घेण्यासाठी मी पृथकला जीवे मारले. उमाने गुन्हा कबुल करताच पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिचे वय १९ वर्षीय आहे.